ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मका अन् सोयाबीनचे भाव राहणार कायम? जाणून घ्या काय आहे कारण…

सध्याच्या जगात कोणत्या वस्तूचे दर कमी जास्त होतील हे सांगता येत नाही.

Soybean Rate | त्याचप्रमाणे शेतमालाच्या दराचे देखील असेच आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेतीतील (Agriculture) पिकाला कधी भाव मिळतो तर नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त असतात. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता बाजारात मका (Maize Rate) आणि सोयाबीनचे दर कायम राहण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे दर का कायम राहू शकतात.

वाचा: Berkeley Fertilizer | काय सांगता? केवळ 18 दिवसांतच पिकांना ‘हे’ खत देतंय पोषण, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

मका आणि सोयाबीनचे दर का राहू शकतात कायम?
युरोपियन ऑस्ट्रेलियन देश मोठ्या प्रमाणात मका, गहू आणि बार्लीची निर्यात करतात. परंतु युरोपियन युनियनमधील देशांना अति उष्णतेचा जोरदार फटका बसत आहे. याच उष्णतेचा फटका शेतीतील (Agriculture in Maharashtra) पिकांना बसत आहे. या उष्णतेचा फटका गहू, बार्ली, मका, सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल पिकांवर होत आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम पिकांवर होत असल्यामुळे उत्पादनात घट होत होताना दिसून येत आहे.

वाचा: Share Market | शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांची हवाचं! सेन्सेक्स आणि निफ्टीने मारली उंच उडी, जाणून घ्या सविस्तर…

उष्णतेचा पिकांना फटका
उष्णतेमुळे पाण्याच्या साठ्यात देखील कमतरता निर्माण झाली आहे. अशातच अगदी फुलावर आलेल्या पिकांची नासाडी होतेय. अक्षरशः पिकांची मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आहे. याचाच परिणाम थेट पिकाच्या उत्पादनावर होऊ शकतो. हे तर निश्चितच आहे. हीच बाब लक्षात घेता अॅग्रिकल्चर सर्व्हिसेस म्हणजेच एमएआरएस या संस्थेने युरोपियन युनियनमधील वसंत ऋतुतील पीक उत्पादनाच्या अंदाजात कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी या हंगामातील सूर्यफूल, मका आणि सोयाबीन या पिकांचे उत्पादन सरासरी उत्पादनापेक्षा आठ ते नऊ टक्क्यांनी कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. याचाच परिणाम पाहता भारतात मका आणि सोयाबीनचे दर कायम राहण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for farmers! Will the price of corn and soybeans remain constant Find out what is the reason

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button