ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Stomach Bloating | पशुपालकांनो पावसाळ्यात जनावरांची पोटफुगी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, ‘या’ आजाराची आहेत लक्षणे

शेतकरी शेतीसह जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात.

पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घेतली पाहिजे.

Stomach bloating/पोट फुगी:
हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते.
कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडची डावी बाजू फुग्यासारखी दिसते.
पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो.
सारखी उठबस करते. टिचकीने आवाज केल्यास टमटम आवाज येतो. अशा वेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही.
फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्‍यता असते.

वाचा: Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मका अन् सोयाबीनचे भाव राहणार कायम? जाणून घ्या काय आहे कारण…

Measure/उपाय –
पोटफुगी टाळण्याकरिता जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते व पोटफुगीची समस्या टाळता येते.
जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते.
पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरावर वेळीच उपचार करता येतील.

वाचा: Wheat | भारतात गव्हाचं संकट? जाणून घ्या काय आहे कारण अन् संपूर्ण गव्हाचं गणित

First Aid/ प्रथमोपचार:
पोटफुगी आजारावर प्रथमोपचार म्हणून अर्धा लिटर गोडेतेलात 30 मि.लि. टर्पेंटाईन, 100 ग्रॅम सोडा व 5 ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावराला ठसका न लागता हळूहळू पाजावे.

पोटाच्या आजारामध्ये पोटफुगी, पावसाळ्यामध्ये नवीन उगवलेलं विविध प्रकारचे गवत मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. कोवळे गवत अधिक खाल्ल्याने जनावरांना पोटफुगी झालेली दिसून येते. यात दोन प्रकार दिसून येतात, एक पोटात मोकळी हवा साचून राहते, दुसऱ्या प्रकारात ह्वेबेरोबर पाणीपण पोटात साचून राहते. नायट्रेट किंवा नायट्रायटची विषबाधा, ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागात अधिक नायट्रोजन गवतामध्ये शोषला जातो. असे कोवळे लुसलुशीत गवत अधिक खाऊ घातल्याने नायट्रेटची विषबाधा आढळून येते. लक्षणामध्ये जनावर लाळ गाळते, श्वास घ्यायला त्रास होतो. चक्कर येऊन जनावर खाली पडते. अधिक प्रमाणात विषबाधा असल्यास चक्कर येऊन जनावराचा मृत्यु होऊ शकतो. पशुपालकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्काशी संपर्क साधावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button