ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land Aadhaar Card | काय सांगता? आता जमीनीचेही मिळणारं आधार कार्ड, शासन निर्णयासह जाणून घ्या फायदा

आता केवळ तुमचे आधार कार्ड नाही, तर तुमच्या जमिनीचा आधार कार्ड बनणार आहे.

Land Aadhaar Card | ज्याप्रमाणे आपला आधार नंबर असतो. त्यावर आपली सर्व माहिती मिळते. त्याचप्रमाणे आता जमिनीचा रेखांश, अक्षांश, जमिनीचे (Land) क्षेत्रफळ जमिनीची मालकी या सर्वांची माहिती असलेल्या पिन नंबर आपल्या सातबारावर प्रिंट केला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक जमिनीला (Agriculture in Maharashtra) प्रत्येक सातबाराला हा ई-मेल पेन 11 क्रमांकाचा 11 डिजिटचा हा ई-मेल पिन दिला जाणार आहे. या माध्यमातून हे आपण आपल्या शेती (Agriculture) किंवा जमिनीचा आधार कार्ड म्हणू शकतो. हे आधार कार्ड (Land Aadhaar Card) बनवण्यासाठी 28 जुलै 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

का घेण्यात आला निर्णय?
या निर्णयानंतर राज्यातील नागरी आणि शहरी भागातील जमिनींना प्रॉपर्टी नंबर देण्यासाठी जमिनींना (Agriculture in Maharashtra) आधार कार्ड देण्यात येणार आहे. जमिनीची ओळख पटवण्यासाठी, जमिनीची (Agricultural Information) मालकी, जमीन डिजिटल स्वरूपात समजून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जमिनीला हा इवेल पिन नंबर देण्यासंबंधातील सूचना देण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या आधार कार्डमुळे जमिनीची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळणे शक्य होणार आहे.


वाचा:
Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मका अन् सोयाबीनचे भाव राहणार कायम? जाणून घ्या काय आहे कारण…

फसवणुकीला बसणार आळा
केंद्र शासनाच्या 24 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रानुसार डिजिटल इंडिया रेकॉर्ड मॉडर्निझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत संगणकीकरण झालेल्या अधिकार अभिलेखांसाठी क्रमांक देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील जे काही अभिलेख असतील यांच्यासाठी नंबर देण्यात येणार आहेत. राज्यातील जवळजवळ ग्रामीण भागातील 2.62 कोटी सातबाराकीकरण प्रस्तावित करण्यात आलेला आहे. संघनिकीकरणनुसार निर्माण होणार असून, त्यामध्ये शहानिशा करण्याची व्यवस्था असणार आहे. या जमिनीच्या आधार कार्डमुळे फसवणूक टळणार आहे. डुप्लिकेट कागदपत्रे (Document) यांसारख्या फसवणुकीपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button