ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

ब्रेकिंग! आता फळबाग लागवडीसाठी मिळणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या पात्रतेसह अर्ज प्रक्रिया

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून विशेष गाजले. यामध्ये विरोधी पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व पीकविमा यांसारख्या प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केल्या विविध योजना

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत ( PM Kisan Yojna) शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची आर्थिक मदत केली जाणार. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा काढून मिळणार , धान्य उत्पादकांसाठी बोनस, मागेल त्याला शेततळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही सुद्धा राज्य सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. राज्यात 2018-19 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्य सरकारच्या योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविली जात आहे. राज्यातील फळबागांचा विकास व्हावा व फलोत्पादन वाढावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

तीन टप्प्यात 100 टक्के अनुदान दिले जाते

फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान ( Subcidy) दिले जाते. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर झालेले अनुदान तीन टप्प्यांत दिले जाते.

1) पहिले वर्ष – ५० टक्के अनुदान
2) दुसरे वर्ष – ३० टक्के अनुदान
3) तिसरे वर्ष – २० टक्के अनुदान

महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायतीसाठी 90 टक्के व कोरडवाहूसाठी 80 टक्के असणे आवश्यक आहे. दरम्यान हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने झाडे आणून जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे ठेवावे लागेल.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन संच असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची उपजीविका फक्त शेतीवर अवलंबून आहे त्यांना या योजनेसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच फक्त वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर स्वतःचा सातबारा असणे आवश्यक आहे. तसेच सात बाऱ्यावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे गरजेचे आहे.

योजनेसाठी असा करा अर्ज

या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास महाडीबीटी पोर्टल वर जाऊन योजनेचा ऑनलाइन अर्ज भरू शकता. तसेच ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी केंद्रात संपर्क साधावा. याठिकाणी अर्ज उपलब्ध असेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

State government announced Bhausaheb Phundkar Phalbag Lagawad Yojana 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button