ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Loan | शेतीसाठी तब्बल 3 लाखांपर्यंत मिळतंय बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या कधीपासून होणारं वाटप सुरू

Crop Loan | शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्जाचे (Crop Loan) वाटप सुरू करण्यात येणार आहे.

Crop Loan | शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. परंतु शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पन्न निघत नसल्याने हे पैसे उदरनिर्वाहासाठीच खर्चून जातात. यामुळे शेतकऱ्यांना गरज पडते ती पीक कर्जाची. शेतकऱ्यांना एखाद्या पिकावर पीक कर्ज (Crop Loan) काढता येते. आता शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज (Crop loan) मिळत आहे. आता याचं पीक कर्जाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना या पीक कर्जाचे वाटप कधी सुरू होणार आहे हे जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना मिळतंय बिनव्याजी कर्ज
शेतकऱ्यांना 2019 पासून 1 रुपया ते 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज (Crop Loan) हे बिनव्याजी स्वरूपात दिले जात आहे. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे राज्य शासनाच्या माध्यमातून तर 1 लाख पासून 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पुर्णपणे बिनव्याजी दिली जातात. शेतकऱ्यांना या पीक कर्जाचे (Loan) वाटप जिल्हा मध्यवर्ती बँक, खाजगी बँकांच्या माध्यमातून केली जातात.

शेतकऱ्यांना मिळते अनुदान
इतकचं नाही, तर विहित कालावधीत आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या पीक कर्जाच्या व्याजजाची रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. तसेच जे शेतकरी 31 मार्चपर्यंत आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज मिळते. तसेच जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करत नाहीत, ज्यांची खाती थकीत असतील अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात.

कधी होणार पीक कर्जाचे वाटप सुरू?
शेतकऱ्यांना महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून पीक कर्ज 2023 चे वाटप सुरू होणार आहे. हे पीक कर्ज जिल्हास्तरिय बँक, सहकारी बँक यांच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Interest-free loans up to 3 lakhs are available for agriculture; Know when allotment starts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button