ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Solar Pump | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सौरपंपाच्या जोडणीसाठी नोंदणी सुरू, त्वरित जाणून घ्या प्रक्रिया

Solar Pump | ‘मुख्यमंत्री सौर पंप योजना' अंतर्गत सौर पंप (Solar Pump) जोडणीसाठी नोंदणी सुरू झाली आहेत.

Solar Pump | शेतकऱ्यांना ते मोठ्या प्रमाणात गरज असते ती पाण्याची. शेतीला पाणी देण्यासाठी मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तास वीज देण्यात येते. परंतु सातत्याने लाईट ये जा करते, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला व्यवस्थित पाणी जात नाही. तसेच शेतीला 8 तास वीज (Solar Pump) पुरेशी होत नाही म्हणून शेतकऱ्यांना 12 तास वीज प्राप्त व्हावी म्हणून राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर पंप (Solar Pump) योजना राबवली जाते. याबाबतच मोठी माहिती समोर आली आहे.

सोलर पंपासाठी नोंदणी सुरू
मुख्यमंत्री सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना सौर पंपाची (Solar Pump) जोडणी करण्यात आली नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. आता या शेतकऱ्यांसाठी 1 लाख सोलर पंप देण्यात येणार आहेत. आता महावितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेज करण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप बसवायचे आहेत त्या शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

कोणत्या लिंकवर कराल नोंदणी?
ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप जोडण्यासाठी नोंदणी करायचे आहे. त्यांच्यासाठी एक ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे. तुम्हाला जर सौर पंप जोडण्यासाठी अर्ज करायचा असेल तर https://wss.mahadiscom.in/wss/wss_AG_PP_Consent.aspx या लिंकवर जावे लागेल. मी जर या लाभासाठी प्रलंबित ग्राहक असाल तर तुमच्या मोबाईलवर हा लिंकचा मेसेज महावितरणाकडून येईल.

कशी कराल नोंदणी
तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यावरून तुम्ही सौर पंपासाठी नोंदणी करू शकता. या पेजवर तुम्हाला ग्राहक क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरून तुम्ही सौर पंपासाठी नोंदणी करू शकता. अशाप्रकारे शेतकरी सौर पंपासाठी नोंदणी करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

जमिनीची मोजणी होणार एका झटक्यात! राज्यभरात राबवला जाणार ‘हा’ प्रकल्प, शेतकऱ्यांची फसवणूकही टळणार

Web Title: Important news for farmers! Registration for solar pump connection started, apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button