ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

E Land Survey | जमिनीची मोजणी होणार एका झटक्यात! राज्यभरात राबवला जाणार ‘हा’ प्रकल्प, शेतकऱ्यांची फसवणूकही टळणार

E Land Survey | आपल्याला जमीन मोजणी करायची असेल तर सर्वप्रथम ती जमीन किती आहे हे फक्त आपल्याला कागदपत्रावरील माहितीवरुन समजते. मात्र, खरीखुरी आपली जमीन किती आहे? हे आपल्याला तेव्हाच समजते जेव्हा आपण जमीन मोजणी करून घेऊ. पण जमिनीची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. जमिनीची मोजणी (E Land Survey) आणि कागदी नकाशे नाही तेच होणार आहेत. त्याचं कारण म्हणजे आता डिजिटल युग आहे. डिजिटल युगात सर्व काही डिजिटल स्वरूपातच समोर येत आहे. आता शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी काही क्षणातच करणे शक्य होणार आहे.

जमिनीची मोजणी होणार एका झटक्यात
शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेखा त्यामध्ये अनेक खेट्या माराव्या लागतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाया जातो, तसेच येण्या- जाण्यामुळे आर्थिक खर्च देखील होतो. पण आता शेतकऱ्यांचे जमीन मोजणीचे टेन्शन कायमचं दूर होणार आहे. कारण आजच्या डिजिटल युगामध्ये जमिनीची मोजणी थेट डिजिटल पद्धतीनेच होणार आहे. याबाबत राज्यामध्ये एक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शेतकरी एका झटक्यात आपल्या जमिनीची मोजणी करू शकतात.

ई-मोजणी प्रकल्प
आता शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख संचालनालयाकडून ‘जीपीएस’च्या मदतीने ‘ई-मोजणी प्रकल्प’ (E-Land Survey) राज्यभरात राबवला जाणार आहे. या ई- मोजणी प्रकल्पाद्वारे शेतकरी थेट आपल्या मोबाईलवरून जमिनीची मोजणी करू शकणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक खर्चही होणार नाही.

शेतकऱ्यांची फसवणूक टळणार
भली मोठी शेतजमीन असो वा जमिनीचा तुकडा जमीन म्हटलं की, जमिनीचा मालकी हक्क आलाच. मात्र अनेकदा या जमिनीच्या मालकी हक्कावरून मोठमोठे वाद होतात.साध्या पद्धतीने जमिनीची मोजणी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. तसेच जमिनीची मोजणी साध्या पद्धतीने करताना गावातील प्रमुखांना बोलावले जाते. परंतु यावेळी देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आता ही फसवणूक कायमचीच टळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या वाटेची हक्काची जमीन मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The land will be counted in a flash! This project, which will be implemented across the state, will also avoid cheating farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button