ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Medicine |बाप रे! भारतात सर्वाधिक वापरलं जाणाऱ्या ‘पॅरासिटामोल’सह ‘या’ 45 औषधांचा निकृष्ट दर्जाच्या औषधांमध्ये समावेश

Medicine | आफ्रिकन देश गाम्बियामध्ये (gambia) एका भारतीय औषध (medicine) कंपनीचे खोकल्याचे सिरप (cough syrup) प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय कंपन्यांचे चार कफ सिरप घातक घोषित केले होते. परंतु यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी काही औषध कंपन्यांचे (pharma company) नमुने हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आलं आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालानुसार सुमारे 45 औषधांचे (medicine) नमुने हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले.

तसेच या निकृष्ट औषधांच्या नमुन्यांपैकी 13 हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उत्पादन युनिटमधील आहेत. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या औषधांचे नमुने हे निकृष्ट आढळून आले आहेत त्यामध्ये पॅरासिटामॉलचा (Paracetamol) देखील समावेश आहे. तसेच भारतात सर्रास पॅरासिटामॉल (Paracetamol) हे मोठया प्रमाणावर वितरण केले जाते. ‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, मे महिन्यात, सहाय्यक औषध नियंत्रक आणि परवाना प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडविरुद्ध तपास सुरुकरण्यात आला होता. ग्लेनमार्कच्या टेलमिसार्टन (Telmisartan) (रक्तदाबासाठी वापरल्या जाणारे) हे औषध ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स अधिनियम 140, कलम 17B(E) अंतर्गत संशयास्पद आढळून आले होते. मोहालीस्थित या औषध कंपनीचे ऑफलोक्सासिन (Ofloxacin) आणि ऑर्निडाझोल (Ornidazole) अँटीबायोटिक औषधांचे नमुनेही चाचणीत उत्तीर्ण झाले नाहीत.

वाचा: बिग ब्रेकिंग! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का नाही?

पॅरासिटामॉल चाचणीत ठरल्या निकृष्ट दर्जाच्या

हिमाचलमधील अनेक उत्पादन युनिटमधून घेण्यात आलेल्या पॅरासिटामॉल चाचणीत निकृष्ट दर्जाच्या ठरल्या आहेत. ही विघटन चाचणी (Dissolution test) महत्त्वपूर्ण असून टॅब्लेट, कॅप्सूल, मलम इ. सारख्या औषधांमधून द्रावण तयार होण्याचे प्रमाण आणि दर मोजते.
तसेच चंडीगढच्या औषध कंपनीने बनवलेले अँटिबायोटिक जेंटॅमिसिन इंजेक्शन (Gentamicin injection), बेक्टोरियल एंडोटॉक्सिन आणि स्टेरिलिटी हेही या चाचण्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे आढळून आलेत. हिमाचलमधील काला एमबीच्या निक्सी लॅबोरेटरीजचेऍनेस्थेसिया प्रोपोफोल (anaesthesia Propofol) हे औषधही गुणवत्ता चाचणीत फेल ठरली होती. पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर चंदिगड पीजीआयएमईआर येथील आपत्कालीन वॉर्डमधून नमुना गोळा करण्यात आला. या सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी हे वेदनानाशक औषध (anaesthesia) देण्यात आले होते. हिमाचलच्या फार्मास्युटिकल कंपनीला या बॅचची सर्व औषधे मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्तांसाठी तब्बल 132 कोटींच्या निधी वितरणास मान्यता; जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा

ही औषधे ठरली निकृष्ट

Methycobalamin, Alpha Lipoic acid- USV Pvt Ltd. Baddi

Medicare,Paracetamol Tablets – T&G Medicare, Baddi

Paracetamol Tablets- Alco Formulation, Faridabad

Paracetamol Tablets- ANG Lifesciences, Solan

Chlordiazepoxide- Wockhardt, Nalagarh

Amoxicillin-Potassium Clavulanate- Mediwell Bioteh solan

Vitamin D3 Chewable tablets- Maxtar Biogenics, Nalagarh

Ofloxacin and Ornidazole tablets- Amkon Pharmaceuticals, Mohali

Lvermectin dispersible Tablets- Plena Remedies, Baddi

Itraconazole Capsules- Theon Pharmaceuticals, Baddi

Gentamicin Injection- BM Pharmaceuticals, Chandigharh

Mefenamic acid tablets- Navkar Lifesciences, Baddi

Aluminium hydroxide- Biogenetic Drugs Pvt Ltd. Baddi

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Now, many companies have failed in yet another drug trial

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button