ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार खात्यात जमा

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रतोसहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे. आता याच अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या (Agriculture) याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर (Financial) लवकरच जमा होणार आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्तांसाठी तब्बल 132 कोटींच्या निधी वितरणास मान्यता; जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा

50 हजारांचे अनुदान जमा होण्यास दिरंगाई
50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान 15 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या (Agriculture in Maharashtra) खात्यात जमा होणार होते. मात्र, ते अद्यापही झाले नाही. ज्याचं मोठं कारण म्हणजे शेतकऱ्यांची (Lifestyle) असलेली चुकीची माहिती. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांच्या (Agriculture Information) खात्यात जमा होण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Lifestyle) रोष निर्माण केला जात होता.

50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या कधी येणार अन् त्वरित चेक करा तुमची पात्रता

शासन निर्णय
शेतकऱ्यांच्या निर्माण होणारा रोष आणि प्रतीक्षा पाहता 11 ऑक्टोबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली होती. तेव्हा 12 ऑक्टोबर 2022 रोजी या याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले. या याद्या आज प्रकाशित करून पुढील केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात यावी. ही केवायसी प्रक्रिया 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी असे सूचना देण्यात आले आहेत. याच सूचनांच्या अधीन राहून आज एक परिपत्रक काढण्यात आले आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो कापूस आणि सोयाबीनच्या दरात होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर

कधी होणार 50 हजार खात्यात जमा?
आता 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या अनुदानासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही केवायसी बँकांना पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. ही केवायसी प्रक्रिया 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही 50 हजारांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी किंवा ऐन दिवाळीत देखील जमा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! 50,000 Incentive Grant Lists Announced, Deposited in Accounts from Date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button