ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या कधी येणार अन् त्वरित चेक करा तुमची पात्रता

Subsidy | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षांत किमान 2 वर्षे पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Agriculture) राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो या अनुदानासाठी (Subsidy) तुम्ही पात्र आहात का? तुमची संपूर्ण कागदपत्रे बरोबर आहेत का? हीच ऑनलाईन पद्धतीने माहिती कशी पहायची, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: 12व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! सात दिवसांत येणार खात्यात पैसे, एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला मिळणार का नाही?

प्रोत्साहन अनुदान
नियमित पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे प्रोत्साहन अनुदान 15 ऑक्टोबरपासून जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ज्यासाठी याद्या मागवण्यात आल्या होत्या. परंतु या याद्यांमधील जवळपास 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची (Agricultural Information) माहिती चुकीची असल्यामुळे शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले. याचमुळे या याद्या पुढे अनुदानासाठी (Subsidy) जाऊ शकल्या नाहीत. परंतु या याद्या पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केल्या जातील असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप देखील या याद्या प्रकाशित करण्यात आल्या नाहीत. याच याद्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर

बाजारात लाल मिरचीचा ठसका वाढला! आवक कमी असल्याने मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या अजूनही दरात होईल का वाढ?

कशी पाहाल तुमची पात्रता?
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान मिळणार की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल. ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता. ज्यासाठी तुम्ही सीएससीच्या (csc) पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून तुमची पात्रता कागदपत्रे तपासू शकता. शेतकरी पूर्णपणे पात्र झाल्यानंतर याद्या प्रकाशित होतील. त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा होईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big update regarding the incentive grant of 50 thousand! Know when it will come and check your eligibility instantly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button