ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | पुन्हा शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी! राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; हवामान विभागाचा तब्बल 29 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

Weather | राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढतच चालला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने (Monsoon Update) चांगलच झोडपून काढलं आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. इतकचं नाही, तर शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत झाले. आजही हवामान विभागाने (Meteorological Department) राज्यातील 29 जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर

कोणत्या जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट?
आज कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Update) नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर तर विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या जिल्ह्यांना हवामान विभगाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभर या जिल्ह्यांत विजांसह पाऊस होऊ शकतो.

वाचा: बाजारात लाल मिरचीचा ठसका वाढला! आवक कमी असल्याने मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या अजूनही दरात होईल का वाढ?

50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या कधी येणार अन् त्वरित चेक करा तुमची पात्रता

पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
पावसाचा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जोर वाढत चालला आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील हा पाऊस हजेरी लावतोय. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीला आले आहे मात्र या पावसामुळे या पिकाचे नुकसान होताना दिसून येत आहे. तर या पावसाचा मिरचीला देखील फटका बसला आहे. या पावसाचा जोर वाढतच राहिला तर शेतकऱ्यांना आणखी फटका बसू शकतो.

Web Title: Farmers, the force of the return of rain has increased in the state! As many as 29 districts have been issued ‘yellow’ alert by the meteorological department

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button