ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Life Style |तुम्हालाही जास्त विचार करायची सवय आहे का ? तर मग करा ‘या’ गोष्टी; होईल चांगला फायदा

Life Style | आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर विचारांशिवाय माणसाच्या आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. असे म्हणतात की माणूस झोपेत देखिल विचार करत असतो. विचारांचा संबंध हा थेट मेंदू आणि मनाशी असतो. किंबहूना वैचारिक बैठक असल्यानेच माणूस हा अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. अनेक अध्यात्मिक गुरू तर म्हणतात की तुमचे विचारच तुमचे जीवनात काय घडेल हे ठरवतात. द सिक्रेट हे पूस्तक देखिल मानवी विचार प्रक्रियेबाबतच सांगतो. तुम्ही जो विचार करता ते तुमच्या आयुष्यात परतते. म्हणूनच संत-महात्मा सांगतात की आपण नेहमी चांगल्या दिशेने विचार करायला हवा.

विचार हे अनेक प्रकारचे असतात. त्यात सकारात्मक-नकारात्मक, किंवा एकच विचार वारंवार येणे, असे अनेक प्रकार आहेत. एका संशोधनानुसार माणसाला 24 तासात 70 हजारपेक्षा जास्त विचार येतात. हे फक्त सामान्य विचार करणा-यांसाठी. मात्र बदलती जीवन शैली Life Style मुळे आपल्या विचाराच्या कक्षा देखील रुंदावल्या आहेत. वाचन करणे, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे आणि अन्य अनेक कारणांमुळे अनेकांना खूप जास्त विचार करण्याची सवय जडते. अशा माणसांना एक मिनिट देखिल शांत राहता येत नाही. खूप जास्त विचार करणे हा देखिल एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. परंतु यावर उपाय म्हणून मग काही लोक योगासन प्राणायाम या Life style कडे वळतात. मात्र एवढे करूनही अनेकांची खूप जास्त विचार करण्याची सवय जात नाही. योगासन प्राणायाम यांच्यामुळे थोडावेळ साठी विचारांची गती कमी होते. मात्र, अनेक वेळा आपल्या आजकालच्या फास्ट फॉरवर्ड Life style मुळे योग-प्राणायामाच्या सवयीत देखिल सातत्य राहत नाही. परिणामी जास्त विचार करणे, अतिरिक्त विचार करणे हा आजार काही जात नाही. यावर हे साधे उपाय करून पाहा.

वाचा: आर्थिक चणचण जाणवतेय? तर दिवाळीच्या पहाटे करा ‘ही’ कामे; तुम्हीही नक्की व्हाल श्रीमंत

विचार कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

दर दोन तासातून 5 मिनिटे स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. घड्याळात वेळ लावून किंवा मोबाईममध्ये अलार्म लावून मोजून 5 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष द्या. लक्षात घ्या की तुम्हाला प्राणायाम करायचा नाही. फक्त श्वासावर लक्ष द्यायचे आहे. डोळे मिटून तुम्हाला फक्त एवढे लक्ष द्यायचे आहे की श्वास कसा येतो आणि कसा जातो. तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर मग यावर श्वास मोजणे हा देखील एक चांगला प्रभावी उपाय आहे. विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून श्वास उलटे मोजायचे आहे. म्हणजे 100, 99, 98 असे करत एक पर्यंत यायचे. किमान 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. हा उपाय दररोज केल्याने निश्चितच विचारांची गती ही कमी होईल.

यावर तिसरा उपाय हा मुद्रा रहस्यात देण्यात आला आहे. मुद्रा विज्ञान तुम्हाला तुमचे विचार नियंत्रणात आणण्यासाठी खूप मदत करते. तुम्ही खूप जास्त विचार करत असाल तर तुम्ही ‘ ज्ञान मुद्रा’ करा. ज्ञान मुद्रेचे इतर अनेक लाभ होतात. मात्र विचारांची गती कमी करण्यासाठी ध्यान धारणा करण्यासाठी या मुद्रेचा मोठा उपयोग होतो. शिवाय तुम्ही हे अगदी कधीही करू शकता. फक्त जेवणानंतर लावू नये. दररोज 48 मिनिटे दोन्ही हाताने ज्ञान मुद्रा लावल्याने निश्चितच विचारांची गती कमी होते.

वाचा: शेतकऱ्यांची चांदी! उडदाला मिळतोय तब्बल ‘इतका’ भाव; जाणून घ्या तूर, कांदा आणि सोयाबीनचे ताजे दर

कशी लावावी ज्ञान मुद्रा ?

आपल्या हाताचा अंगठा आणि अंगठ्याजवळचे पहिले बोट म्हणजे तर्जनी यांचा अग्रभाग म्हणजे सर्वात वरचा भाग हे दोन्ही एकमेकांना जोडून बाकी सर्व बोट ही सरळ ठेवावे म्हणजे ती ज्ञानमुद्रा होते. दोन्ही हातांच्या बोटाने ही मुद्रा लावून 48 मिनिटे बसा. दररोज सराव केल्याने निश्चितच विचारांची गती ही कमी होते. ज्ञान मुद्रा कशी लावावी हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोबत जोडलेला फोटो पाहा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Do you think too much? So try ‘these’ things you will also benefit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button