ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्लायोजना

Onion variety| उन्हाळ कांद्याला टक्कर देणारं नवीन लाल कांद्याचं वाण विकसित, प्रती हेक्टर देणार तब्बल ‘इतकं’ उत्पादन

कांद्याच्या दराबाबतचा गोंधळ होऊन काही फार दिवस झाले नाहीत. कांद्याचे दर अगदी रसातळाला गेले होते. उत्पादन खर्चही निघत नव्हता. लाल कांदा असेल तर तो लगेच विकावा लागत असे. या कांद्याची साठवण क्षमताही खूप कमी असल्याने शेतकरी अडचणीत होते. मात्र आता लाल कांद्याचं एक असं वाण विकसित झालं आहे जे या अडचणींवर मात करू शकतं. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हे वाण लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

कुणी विकसित केलं वाण

लाल रंगाच्या कांद्याला बाजारात उत्तम मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रानं हे वाण विकसित केलं आहे. उन्हाळ कांद्याप्रमाणेच याची टिकवण क्षमता आहे. लाल कांद्यामधीलच हे नवीन वाण विकसित करण्यात आलं आहे. हेक्टरी 380 ते 400 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हे वाण आहे. एन एच आर डी एफ फुरसुंगी असे या लाल कांद्याच्या वाणाला नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी लवकरच हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.

हा आहे फायदा

उन्हाळ कांद्याप्रमाणे याची टिकवण क्षमता पाच ते सात महिने असते. हे वाण 110 ते 120 दिवसात काढणीला येतं. याचं वजन देखील चांगलं असतं. यामुळे प्रति हेक्टर साधारणतः 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव या नवीन कांद्याच्या पिकावर कमी प्रमाणात होतो. हा कांदा साठवणूक केल्यानंतर काळपट पडण्याचं प्रमाणही कमी आहे. लाल रंग असल्यानं बाजारात देखील मागणी अधिक असेल असा अंदाज आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

कधी मिळणार बियाणं

शेतकऱ्यांसाठी 15 ऑगस्ट पासून बियाणं उपलब्ध होणार आहे. एन एच आर डी एफ फुरसुंगी हे या वाणाचं वितरण करणार आहे. या नवीन वाणाचं बियाणं नाशिक जिल्ह्यातील चितेगांव, लासलगाव आणि सिन्नर येथील केंद्रांवर मिळणार आहे.
राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राचे प्लांट पॅथॉलॉजी टेक्निकल अधिकारी मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या वाणाच्या किंमतीबद्दल स्पष्टता विक्री वेळीच होईल. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करणारं हे वाण फायदेशीर ठरणार हे मात्र नक्की.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button