ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Lifestyle| उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहायचंय? मग वापरा ‘या’ गोष्टी, घामाच्या दुर्गंधी पासून मिळेल मुक्ती

Lifestyle| उन्हाळा म्हटलं की घाम आणि घाम म्हटलं की दुर्गंधी. या दुर्गंधीमुळे स्वतःला तर त्रास होतोच मात्र आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो. यावर आपला उपाय म्हणजे परफ्युम किंवा बॉडी स्प्रे. मात्र अंघोळ करताना जर काही गोष्टी तुम्ही पाण्यात घातल्यात तर घामाचा वास दूर होण्यास मदत होते. यामुळे सतत परफ्युम आणि बॉडी स्प्रे वापरण्याचीही आवश्यकता राहत नाही. यासाठी अंघोळीच्या पाण्यात पुढील गोष्टी वापरल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

गुलाब पाणी, लिंबू

गुलाब पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. गुलाब पाणी आपल्याला घरातही नैसर्गिकरित्या तयार करता येतं. अंगाला दीर्घकाळ गुलाबाचा वास येत राहिल्यानं आपल्यालाही मस्त आणि प्रसन्न वाटतं. तर अंघोळ करताना काखेत, मानेत, जांघेत ज्याठिकाणी जास्त घाम येतो अशा ठिकाणी लिंबाची फोड चोळायची. हे लावताना लिंबाच्या फोडीला मीठ लावल्यास उत्तम. 

बेकींग सोडा, बाथ सॉल्ट

अंघोळ करताना बेकींग सोड्याचा वापर पावडरसारखा करावा. बेकींग सोडा पावडरी प्रमाणे अंगावर टाकून थोड्या वेळाने झटकून टाकावा. एक कप पाण्यात २ चमचे बेकींग सोडा घालून ते पाणी घाम येतो त्याठिकाणी फवारल्यास घाम कमी होतो. तसेच मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यासही फायदा होतो. मीठामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. या घटकांमुळे थकवा दूर होतो. तसेच उन्हामुळे झालेले टॅनिंग, त्वचेला येणारी खाज, कोरडेपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी १ बादली पाणी असल्यास १ चमचा मीठ घालून ते दहा मिनीटं पाण्यात विरघळू द्यावं आणि मग त्या पाण्यानं अंघोळ करावी. यामुळं दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

यु डी कलोन (Eau de Cologne)

हे एक प्रकारचं सुगंधी द्रव्य आहे. हे वापरल्यामुळं ताजेपणा येतो. अंघोळीच्या पाण्यात यु डी कलोन घातल्यास अंगाचा सुवासिक वास येतो. हा सुगंध दिर्घकाळ तसाच राहतो. त्यामुळं अंघोळ झाल्यावर परफ्यूम, बॉडी स्प्रे मारण्याची गरज उरत नाही. अशाप्रकारे अंघोळ करताना या गोष्टी वापरल्यास उन्हाळभर छळणाऱ्या घामाच्या दुर्गंधी पासून सुटका होण्यास मदत होईल आणि आपल्याला आजूबाजूच्या लोकांसोबत फ्रेश मूडमध्ये राहता येईल.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button