ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

CM Eknath Shinde| अयोध्येहून परतल्यावर मुख्यमंत्री लागले कामाला, शेतकऱ्यांना म्हणाले, तुम्हाला…; जाणून घ्या सविस्तर

CM Eknath Shinde| शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं. बीड, नाशिक, अहमदनगर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना गारपिटीनं झोडपून काढलं. राज्यात अवकाळी न दाणादाण उडवली. बळीराजाची नजर सरकारवर. पण सरकार? राज्याचे मुख्यमंत्री अयोध्येत. रामलल्लाच्या चरणी. परत कधी येणार? शेतकरी त्यांच्या वाटेकडं डोळे लावून बसलेले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा वर्षाव सुरू केला. शेवटी दोन दिवसाचा दौरा आटपून मुख्यमंत्री परतले. कामाला लागले. म्हणाले,

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

काय म्हणाले मुख्यमंत्री

अवकाळीमुळं झालेल्या नुकसानी बाबत मी मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. त्याना तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान झालेल्या काही ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतः जाऊन आलेले आहेत. त्यांनी स्वतः पाहणी केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळं शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कृषीमंत्र्यांनी केली पाहणी

कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बीड तालुक्यातल्या कोळवाडी येथे एक किलोमीटरचा डोंगर पार करून कृषीमंत्री थेट बांधावर पोचले. बीड तालुक्यातील कोळवाडी पिंपळनई, लिंबागणेश या ठिकाणी त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी कृषीमत्र्यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधला. नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं. पिंपळनई गावातील काही महिलांनी तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी सत्तार यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी सांगितलं की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. शेवटी कृषीमंत्र्यांनी महिलांचे पाय धरले आणि तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

या जिल्ह्यांना गारपिटीचा फटका

नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा फटका बसला आहे. यामध्ये डाळिंब, द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे शेड, घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गारेगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडून नुकसान झालं आहे. कित्येक संसार आता उघड्यावर पडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर पंचनामे युद्ध पातळीवर होतील. मात्र मदत कधी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

कधी मिळणार बियाणं

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button