ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Milk Rate | शेतकऱ्यांच्या दुधाला जागतिक बाजारपेठ; लगेच जाणून घ्या परदेशात दुधाला किती मिळणार भाव?

Milk Rate | भारतातील दुग्ध क्षेत्रातील दिग्गज, अमूल आता अमेरिकेतही आपला व्यवसाय पसरवणार आहे. अमूलने अमेरिकेतील मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) या कंपनीसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, अमूल अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील भागात ताजे दूध(Milk Rate) विकणार आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी या कराराची माहिती दिली. ते म्हणाले, “अमेरिकेतील 108 वर्षांच्या मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनसोबत अमूलने करार केला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय आणि अशियायी लोक राहतात आणि त्यांच्यासाठी अमूलचे ताजे दूध उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.”

अमूल अमेरिकेत 3.8 लीटर आणि 1.9 लीटरच्या पॅकिंगमध्ये दूध विकणार आहे. अमेरिकेतील दुधाच्या बाजारपेठेची क्षमता 60 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे आणि अमूल या बाजारपेठेचा मोठा हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

वाचा| दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांची वाट, ६० हजारांची यादी अपलोड, ४.५ लाखांची बाकी!

भारतात अमूलचे दर काय?

अमूल ही भारत देशातील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. सध्या भारतात अमूलचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • 1 लिटर दूध – ₹54
  • 500 मिली दूध – ₹27
  • 180 मिली दूध – ₹10
  • 1 लिटर अमूल गोल्ड दूध – ₹66
  • 500 मिली अमूल गोल्ड दूध – ₹33

जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा 21 टक्के

1950 ते 1960 च्या दशकात भारताची दुधाची स्थिती चांगली नव्हती. मात्र, त्यानंतरच्या काळात भारताने हळूहळू दूध उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली. सध्या जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा 21 टक्क्यांचा आहे.

अमूलच्या अमेरिकेत प्रवेशामुळे भारतीय दुग्ध क्षेत्राला मोठे यश मिळेल आणि भारतीय दुधाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळेल यात शंका नाही.

Web Title | Milk Rate | Global markets for farmers’ milk; Find out immediately how much the price of milk will be abroad?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button