ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९

Corona | बाप रे! राज्यात जून-जुलैमध्ये येणारं कोरोनाची चौथी लाट? वाचा आरोग्य मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

देशामध्ये कोरोना विषाणूची (Covid-19) तिसरी लाट ओसरली असून, अनेक राज्यांमध्ये तुरळक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे.

Corona | मात्र, कोरोना विषाणूचा (Corona virus) धोका अद्याप संपलेला नाही. दरम्यान, राज्यात कोरोनाची चौथी लाट जून-जुलै या महिन्यामध्ये येणार असल्याचा धोका राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका (Corona virus threat) अजून टळला नसून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?
जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कोरो नाच्या चौथ्या लाटेचा जास्त परिणाम जाणवणार नाही. तसेच, चौथ्या लाटेपासून दूर रहायचे असेल तर लसीकरण (Vaccination) करा,” असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.

वाचा: Corona | ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मान्यता? WHO चा दावा, कोरोनाच्या नव्या विषाणूचा अधिक धोका

कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज
यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढवणे हेच महाराष्ट्रासमोर महत्त्वाचे काम असेल. आरोग्य विभाग यासंदर्भात सजग आणि जागरूक असून लसीकरणाचे काम करत असल्याचेही प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ज्या भागातील नागरिक येण्यास तयार नाहीत, अशा ठिकाणी जाऊन लसीकरण करण्याचे निर्देशही राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वर्तवला धोका
याअगोदर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा अभ्यास केल्यानंतर कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट तयार होत असून कोरोनाची चौथी लाट लवकरच येणार असल्याचा दावा व्यक्त केला होता. कोरोना विषाणूचा हा नवीन व्हेरियंट डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकत्रित मिश्रण असणार आहे. मात्र, हा नवीन व्हेरियंट जीवघेणा असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने संस्थेने स्पष्ट केले आहे.

वाचा: Coronavirus | बाप रे! कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आता पसरतोय ‘हा’ रोग, संशोधनात माहिती आली समोर

६ ते १२ वयोगटातील मुलांना देणार लस
दरम्यान, वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून कोरोना विषाणूचा तयार होत असलेला नवीन व्हेरियंट हा कोरोणाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा घातक असल्यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासन सतर्क झालेले आहे. तसेच, कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DCGI) भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीस ६ ते १२ या वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीला आणीबाणीच्या काळामध्ये वापरण्याची परवानगी दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button