ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९

Corona | बाप रे! पुन्हा पसरतोय कोरोना विषाणू, ओमिक्रोनचा ‘हा’ नवा सब व्हेरिअंट भारतात दाखल

कोरोना महामारीच्या तीनही लाटांची झळ अजूनही लोकं विसरलेली नाहीत. या महामारीचे लोकांच्या मनातील भय अजूनही गेलेले नाही.

Corona | कोरोना विषाणू (corona virus) हा सर्वात प्रथम चीनमध्ये (China) आला आणि पूर्ण जगभर (World) पसरला. अशातच आता इस्त्राईलमध्ये (Israel) असणाऱ्या तज्ज्ञांनी भारतात कोरोना (corona) ओमिक्रोन (Omicron) व्हेरिअंटचा नवा सब व्हेरिअंट (New sub variant of Corona Omicron variant) पसरला असल्याचा दावा केला आहे. (Patients of Omicron BA 4 and BA 5 sub variants were found in India)

काय आहे नव्या सब व्हेरिअंटच नाव?
महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील ओमिक्रोन BA.4 व BA.5 या सब व्हेरिअंटचे रुग्ण आधीपासूनच सापडत होते. इस्त्राईल मधील डॉ. शाय फ्लेशोन (dr.shay fleshon) यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये भारतात ओमीक्रोनचा नवीन सब व्हेरिअंट BA.2.75 सापडला असल्याची माहिती दिली आहे.

वाचा: Corona | बाप रे! देशात वाढतोय कोरोनाचा वेग, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण तर ‘इतके’ मृत्यू

जगभरात या व्हेरिअंटचे किती रुग्ण आहेत?
भारतामध्ये सर्वाधिक 64 रुग्ण आढळून आले आहेत तर युके(UK) मध्ये 6 व जर्मनी-कॅनडा-यूएस (US) मध्ये प्रत्येकी 2 तसेच आस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी 1 असे रुग्ण पाहायला मिळत आहे.

किती राज्यांत आढळून आले रुग्ण?
दिल्ली-जम्मू-उत्तर प्रदेश प्रत्येकी 1 रुग्ण, तेलंगणात 2 रुग्ण, हिमाचल प्रदेशामध्ये 3 रुग्ण, मध्य प्रदेशात 5 रुग्ण, हरियाणा मध्ये 6 रुग्ण, कर्नाटकात 10 तर बंगाल मध्ये 13 रुग्ण ,आणि महाराष्ट्रात सर्वाधिक 27 रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढयच चालली आहे.

वाचा: Corona | बाप रे! कोरोनाचा होतोय चक्क मेंदूवर परिणाम, जगभरातील संशोधकांनी केलाय ‘हा’ दावा

कोरोना रुग्णांची आकडेवारी
भारतात 43,518,564 इतके रुग्णांची नोंद असून 525,223 एवढी मृत्यू झालेल्यांची नोंद आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी 42,879,477 एवढी आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 7,985,296 हा असून मुत्युची नोंद 1,47,950 झाली आहे. आज दिवसभरात 2962 रुग्ण पॉझिटिव्ह (positive) सापडले असून 3918 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच महाराष्ट्रात दिवसभरात 6 मृत्यू झाले असून भारतात 24 तासांत 24 मृत पावले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button