ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९

Corona | बाप रे! कोरोनाचा होतोय चक्क मेंदूवर परिणाम, जगभरातील संशोधकांनी केलाय ‘हा’ दावा

मागच्या दोन वर्षापासून जग कोरोनापासून लढत आहे. अजूनही कोरोनाचा धोका (Corona danger) संपलेला नाही. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ (Increase in corona patient number) होताना पहायला मिळत आहे.

Corona | भारतात (India) सध्या 4 हजार पेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत कोरोना (Covid-19) हा फक्त श्वासनासंबंधित आजार म्हणून ओळखला जात होता. परुंतु अलीकडेच जगभरातील विविध अभ्यासकांनी (Practitioner) दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार (Medical report) कोरोना थेट मेंदूला धोका पोहोचवतो असे सांगण्यात आले आहे.

Symptomes | कोरोना रुग्णांमध्ये आढळली मेंदूच्या आजाराची लक्षणे
कोरोना संसर्गातून बरे झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये मेंदूच्या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. यामध्ये स्मृती कमी होणे व सौम्य स्ट्रोक ( Brain stroke due to covid) होणे यांची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांच्या मेंदूच्या तपासणी अहवालात सेरेब्रल कॉरटेक्स (cerebr cortex) मधील ग्रे मॅटरची (gray matter) कमतरता आढळली आहे.

वाचा: Corona | बाप रे! देशात वाढतोय कोरोनाचा वेग, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण तर ‘इतके’ मृत्यू

पेशींच्या संक्रमनामुळे येऊ शकतो मृत्यू
बऱ्याच कोरोना रुग्णांच्या केसेस मध्ये असे दिसून आले आहे की, मेंदूच्या पेशींमध्ये होणाऱ्या संक्रमणामुळे मेंदूला झटके येतात किंवा रुग्णाचा मृत्यू होतो. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार कोरोना विषाणू मेंदूतील एस्ट्रोसाईट पेशींनाही नुकसान करत आहे.

वाचा: CORBEVAX | डीसीजीआयकडून कोर्बेव्हॅक्स लसीला बूस्टर डोस म्हणून मंजूर, ‘या’ वयोगटातील नागरिकांना मिळणार लस

Brain stroke | कोरोनामुळे येतो सौम्य स्ट्रोक
याशिवाय कोरोना सांसर्गातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन फॉगची समस्या आढळून आली आहे. लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना संक्रमणामुळे मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा होत नाही व पेरीसाईट्स पेशी खराब होतात. यामुळे सौम्य स्ट्रोक देखील येऊ शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button