ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९

China Corona | बाप रे! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, कडक निर्बंधामुळे नागरिकांची उपासमार, वेळीच सावध राहण्याची गरज; पहा कशी आहे स्थिती…

कोरोनाने एकप्रकारे नागरिकांमध्ये दहशतच निर्माण केली होती. कित्येक रुग्ण कोरोना संक्रमित व्हायचे कित्येक रुग्णांचा जीव देखील गेला.

China Corona | पण तुलनेत आताची परिस्थिती जरा वेगळी आहे. मात्र, त्यामुळे बिनधास्त राहणे चुकीचे ठरणार आहे. कारण चीनमध्ये (China) पुन्हा कोरोनाने मान वर काढली आहे. होय, कोरोना विषाणूमुळे तेथील परिस्थिती आता प्रचंड बिकट झालेली दिसून येत आहे. तेथे पुन्हा रुग्णांची संख्या उच्चांक गाठताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकाच दिवशी आढळले ‘इतके’ कोरोना रुग्ण
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे सोमवारी (4 मार्च) 16,412 कोरोनाचे संक्रमित रुग्ण आढळले. खर तर कोरोना विषाणू आल्यापासून पहिल्यांदाच चीनमध्ये एका दिवशी इतके रुग्ण आहेत. त्यामुळे ही प्रचंड चिंतेची बाब बनली आहे.

वाचा: ‘या’गोष्टी केल्याने होणार नाही कोरोना, वाचा आयुष मंत्रालयाच्या नवीन गाईडलाईन्स…

शांघायमध्ये आहे सर्वात वाईट परिस्थिती
खरं तर, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आर्थिक राजधानी शांघाय (Shanghai Corona) येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्याचा तेथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. शांघायमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कडक लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडताच येत नाही. कारण तशी त्यांना परवानगीच नाही. फक्त मेडिकल किंवा आपत्कालीन काळातच तेथील लोक घराबाहेर पडू शकतात.

शांघायमध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कर बंधोबस्त
त्याचवेळी तेथील कोरोनाची परिस्थिती वाढताना दिसत आहे. त्यामुळे शांघायमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करही कामाला लागले आहेत. ते देखील रस्त्यावर लोकांना लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी कारवाई करत आहेत. तेथे तब्बल 2 हजारांपेक्षा जास्त लष्कर या कार्यासाठी उपस्थित आहेत.

वाचा: ‘त्वचेवर पुरळ येणे’ हे तर ओमायक्रॉन चे लक्षण! ‘ही’ लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा…

शांघायमध्ये कोरोनाचा उद्रेक
चीनमधील आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोनाचा जबरदस्त उद्रेक झाला आहे. रविवारी (3 मार्च) तेथे 8 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडले. त्याचवेळी चीनने सोमवारी (4 मार्च) २ कोटी ६० लाख लोकांची चाचणी केली. त्यावेळी चाचणीसाठी चीनने शांघायमध्ये सैन्य आणि हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले.

कडक निर्बंधामुळे नागरिकांची होतेय उपासमार
त्याचवेळी शांघायमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील लॉकडाऊन हे अधिकच कठीण आहे. तेथील लोकांना शासन निर्बंधात कसलीच शिथिलता देत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. कारण वैद्यकीय कारण वगळता बाकी कोणत्याच कारणास्तव नागरिक घराबाहेर पडू शकत नाहित. त्यामुळे कित्येक नागरिकांची उपासमार होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button