ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांसाठीची बंद झालेली ‘ही’ योजना शासनाने केली पुन्हा सुरू

शेतकरी वर्गाने शेती (Agriculture) करावी आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन (Production) मिळवावे यासाठी केंद्र शासन (Central government) आणि राज्य शासन (State government) वेगवेगळ्या प्रकारच्या योजना व उपक्रम राबवत असतात.

Subsidy | मात्र, आधुनिक पद्धतीने शेती (Agriculture) करून पीक उत्पादन (Crop production) आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे (Modern Agricultural Equipment) असणे आवश्यक बाब आहे. मात्र, काही वेळा इच्छा असून देखील शेतकरी पैशांअभावी यांत्रिक शेती (Mechanical farming) करू शकत नाहीत.

योजना पुन्हा केली सुरू
शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी कृषी यंत्रे घेण्यासाठी राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural mechanization scheme) राबवली होती. मात्र, एका वर्षासाठी ही योजना बंद केल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकार ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेत. तसेच, यावेळी कृषी यंत्रे घेण्यासाठी ना फक्त अनुदान मिळणार आहे, तर सरकारकडून मशिनची संख्याही ८० करण्यात आली आहे.

वाचा: Agriculture | कृषी यांत्रिकीकरणासाठी तब्बल 240 कोटींची मान्यता, शेतकऱ्यांना मिळणारं ‘या’ अवजारांसाठी अनुदान

काय आहे योजना?
शेतकऱ्यांना माफक दरात कृषी यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण सबमिशन योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये नांगरणी, पेरणी, वृक्षारोपण, कापणी व कचरा व्यवस्थापन इत्यादी कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे आता शेतीसाठी वापरली जाणारे यंत्राच्या खर्चामध्ये ५० टक्के अनुदान मिळणार आहे.

वाचा: Central Government Scheme | शेतकऱ्यांनो कर्ज हवंय? तर घ्या केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत पाहिजे तेवढं कर्ज

योजनेचा शेतकऱ्यांना होतो फायदा
दरम्यान, पारंपारिक शेतीला नव्या पद्धतीने आकार देत आता शेतकरी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहे. कमी वेळात आणि कमी मनुष्यबळाचा वापर करून चांगले उत्पादन काडून जास्त उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांचे या प्रयत्नांना सरकारदेखील साथ देत असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button