ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agriculture | कृषी यांत्रिकीकरणासाठी तब्बल 240 कोटींची मान्यता, शेतकऱ्यांना मिळणारं ‘या’ अवजारांसाठी अनुदान

शेतकरी शेतीमध्ये जिवाच्या पलीकडे जावून मेहनत करतो. शेतीतील पिक हे चांगले भरघोस आले तर त्याला नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो. याच दृष्टिकोनातून शेतकरी आपल्या पिकाला मुलाप्रमाणे सांभाळतो.

Agriculture | त्यामुळेच शेतीला जर अभ्यासाची जोड दिली, तर नक्कीच आपल्याला शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. खरं तर, दुष्काळ आणि इतर अनेक अडचणींचा विचार करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळेल. त्यापैकीच एक म्हणजे शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकरण या योजनेला मिळणारे अनुदान. होय, या अनुदानाचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होतो. चला तर मग या अनुदानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कृषी यांत्रिकीकरणासाठी 240 कोटी रुपयांचा निधी मंजूर
नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतकरी वर्ग हा नवीन आधुनिक बदल करून शेती करण्यासाठी राज्य सरकारने राज्य सरकारच्या कृषी विभागाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२१-२२ साठी २४० कोटी रूपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. या योजनेकरिता पहिल्या टप्प्यासाठी ५६ कोटी रुपये, तर पूर्ण वर्षासाठी २४० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच, उर्वरित निधी हा टप्याटप्याने वितरित करण्यात येणार आहे.

वाचा: Crop Loan Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांचे पिक कर्ज अनुदान, जाणून घ्या पात्रता

योजनेचा उद्देश
संबंधित योजनेछा उद्देश हा शेतीमधील उर्जेचा वापर कमी प्रमाणात करून शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे आहे. तसेच, वेगवेगळी प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे शेतकरी वर्गात जागरुकता निर्माण करून कृषी क्षेत्रासंबंधित अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य करून कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे.

वाचा: Subsidy | गाय-म्हशीच्या अनुदानात मोठी वाढ, तात्काळ करा ‘असा’ अर्ज, गाईला 60 हजार तर म्हशीला मिळणारं…

योजनेंतर्गत ‘या’ गोष्टींवर मिळतय अनुदान
दरम्यान, शेतीमधील मशागतीची कामे करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने व अति मनुष्यबळ लागणे यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठी अनुदान उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत मिळते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button