ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Agricultural Technology | शेतीला तंत्रज्ञानाची जोड हवीच? जाणून घ्या काय आहेत कारणं आणि फायदे

नमस्कार मंडळी आपन सर्व शेतकरीच आहोत. पण काही गोष्टी आपन अजुन अवगत केल्या नाहीत. त्या म्हणजे शेतीमध्ये तंत्रज्ञान त्याचबरोबर शेती (Agriculture) कसण्याच्या नवीन पद्धती.

Agricultural Technology | आपलं बियाणं (Seeds) व पिकांमधे (Crop) मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. नविननविन वान बाजारात येत आहेत. त्याचबरोबर इतर क्षेत्राप्रमाणे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचाही वापर होणे गरजेचे आहे. आपण केलेली शेती कसण्यासाठी मेहनत व त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाची जोड या गोष्टीचा समन्वय साधून अधिक उत्पादन घेण्यासाठी आपला शेतकरी वर्ग नेहमी प्रयत्नशील असला पाहिजे.

शेती व्यवसाय

शेती हा व्यवसाय करताना त्या गोष्टीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ढोरं मेहणत करून शेती कसणे म्हणजे शेतीमधुन पिक काढणे नाही, तर त्या मेहनतीला शेतीत योग्य नियोजन व शास्त्र शुद्ध व्यवस्थापनाची दिशा असावं लागतं! शेतीत जे कमी आहे त्या गोष्टीची देखभाल करणं नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर आपल्या शेतीत पाण्याचा काटेकोरपणे वापर करून जास्त उत्पादन घेणं महत्त्वाचं आहे व कमी खर्चात पिकावरील रोग नियंत्रण करणं योग्य खत व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन या सर्व गोष्टी शेती व्यवसायासाठी लाभदायी ठरणार आहे.

वाचा: Use of Slurry | स्लरीचा वापर करून वाढवा उत्पन्न! जाणून घ्या स्लरीचे फायदे व प्रकार

शेतीत नवीन तंत्र विकसित करणे आवश्यक

कुठलेही पीक उत्पादन घेत असतांनाच नवीन तंत्र विकसित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्या हवामानातील बदल याबाबत माहिती आवश्यक आहे. कीड, रोग, तण या बाबतीत आपल्याला अपुरे ज्ञान इत्यादी घटकांमुळे शेती व्यवसायामध्ये पाहीजे तसे उत्पादन मिळत नाही. आपण खरिफ पीक लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी आपल्या पिक उत्पादनाचा अंदाज ही शेतकरीवर्गाला नसतो.

वाचा: Weed Control | एकात्मिक तण नियंत्रण करा आणि उत्पादन वाढवा! जाणून घ्या सविस्तर माहिती…

शेतीत व्यवस्थापन व नियोजन

आपण पिकाला पाहून अंदाज लावतो पण तो खरा ठरत नाही. या बाबतीत एका गोष्टीचा मी अभ्यास केला की, आपल्या शेतीमधल्या पिकांच उत्पादन प्रत्येक हंगामास बदलत असते. त्याबरोबर आकस्मिक होणारा हवामान बदल जसे ओला कोरडा दुष्काळ केव्हा तर पूर परिस्थितींमुळे संपूर्ण शेतीतील पीक उद्ध्वस्त होते. याशिवाय पिकावर जंगलीप्राणी इत्यादी जीव आपल्या पीक उत्पादनांवर परिणाम करतात व नुकसानीस कारणीभूत असतात. आपल्याला जर शेती क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर शेती उत्पादनातील योग्य नियोजन व योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते….

धन्यवाद…!

Save the soil all together
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
9423361185

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button