ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Use of Slurry | स्लरीचा वापर करून वाढवा उत्पन्न! जाणून घ्या स्लरीचे फायदे व प्रकार

स्लरीचा वापराने शेतात जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू कार्यप्रवण होतात. कारण त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूंमुळे जमिनीतील महत्त्वाचे अन्नद्रव्य पिकांना सहजरीत्या उपलब्ध होतात.

Benefits| स्लरीचे फायदे
स्लरी जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म वाढविते. स्लरीचा वापराने जमिनीतील पोकळी वाढवून हवा खेळती राहते. स्लरीमुळे मीनेरालीझेशनची क्रिया लवकर होते. तसेच लहरींमुळे जमिनीतील (Agricultural ) कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर टिकून असते.

स्लरी बनवण्याची प्रक्रिया

  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनावरांच्या जनावरांची ताजी शेन उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे.
  • स्लरी बनवण्यासाठी 500 लिटर सिमेंटची टाकी असावी.
  • 20 किलो शेन, दहा लिटर गोमूत्र, 200 ते 250 लिटर पाणी, सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले हलवुन घ्यायचे.
  • नंतर 300 ते 350 फळझाडांसाठी ताजी शेन 20 किलो, जनावरांचे गोमूत्र 10 लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, युरिया पाच किलो, सिंगल सुपर फास्फेट 10 किलो, पोटात पाच किलो आणि दोनशे ते अडीचशे लिटर पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी बनवावी व साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड एक लिटर याप्रमाणे वापरावी.

वाचा: NSKE Extract Preparation | निंबोळी अर्क वापरा आणि कीड नियंत्रणात ठेवा! जाणून घ्या निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत..

Types of Slurry | स्लरीचे प्रकार
जिवाणू स्लरी:
जिवाणू स्लरी मूळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिले जाते. ताजे शेन 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर,काळा गूळ दोन किलो, ॲसेतोबॅक्टर( Acetobacter) 500 ग्रॅम, फास्फेट सोलुब्लेसिंग मायक्रो ऑरगॅनिझम 500 ग्रॅम, पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम, ई एम द्रावण एक लिटर व इतर जैविक बुरशीनाशके एक किलो ग्रॅम, दोनशे लिटर पाणी.

वाचा: Sesame Cultivation | उन्हाळी तिळाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर माहिती…

सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी:
ही स्लरी बनवताना 20 किलो ताजे शेण, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो,झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट तीन किलो, मॅगनीज दोन किलो, कॉपर सल्फेट 100 ग्रॅम वजन 30 ग्रॅम. दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवताना ताजे शेण 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, कॅल्शियम 15 किलो, मॅग्नेशियम 15 किलो, गंधक 10 किलो, 200 ते 250 लिटर पाणी द्यावे. या तयार मिश्रणाला दोन वेळेस चांगले हलवावे. सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये दहा ते बारा वर्षाचे अंतर ठेवावे.

ऋतुजा ल. निकम

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button