ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

AGNIASTRA : A BOON | कीटकांमुळे त्रस्त आहात? तर वापरा अग्निअस्त्र, जाणून घ्या अग्निअस्त्त्राविषयी संपूर्ण माहिती

सायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची निगा राखली जात नाही. विविध प्रकाराच्या रासायनिक कीटकनाशक व इतर रासायनिक पदार्थांचा वापर करून आपण आपल्या जमिनी तसेच नव्हे तर पिकाचे उत्पादनात सुद्धा कमतरता आणत असतो.

AGNIASTRA : A BOON | परिणामी जमिनीची सुपीकता व जमिनीतील सूक्ष्म जीवांची जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. घराच्या घरी आपण अनेक कीटकनाशके बनउ शकतो जसे की अग्नी अस्त्र , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांची जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपण शेतीचा (Agriculture) खर्च कमी करून जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्यातीलच एक महत्वाचे कीटकनाशक म्हणजे अग्नीअस्त्र. या अग्निअस्त्रच्या वापराने पिकाच्या उत्पादन नक्कीच वाढते.

Materials | अग्निअस्त्राला लागणारे साहित्य
२० लिटर देशी गायीचे गोमुत्र
५०० ग्रॅम हिरव्या मिरचीची चटणी
५०० ग्रॅम गावराण लसूणाची चटणी
५ किलो कडुलिंबाच्या पानांचा लगदा
१ किलो तंबाखू बारीक करून ( तंबाखू विक्रेत्यांकडे तंबाखूचा उरलेला चुरा किंवा दात घासण्यासाठी बनविण्यात येणारी मशेरी किंवा मिसरी बनविण्यासाठी लागणारी भुकटीसारखी तंबाखू जिला आकोट असेही संबोधतात, ती तंबाखूपेक्षा स्वस्त दरात मिळू शकते).

वाचा: Soybean Seed Mahabeej Fraud | पिक आलंय पण फुल आणि शेंगांच काय? महाबीज करतंय शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यात फसवणूक

Procedure | अग्निअस्त्र बनवण्याची कृती
सर्व साहित्य एका पात्रात घेऊन त्यांना कमी आचेवर ठेवून ऊकळवावे. त्यानंतर हे थंड होऊ द्यावे. साधारण दोन दिवसानंतर हे ब्राह्मण फडक्याने गाळून घ्यावे. लगेच वापर करणार नसल्यास प्लास्टिक किंवा काचेच्या पात्रात साठवून ठेवणे लाभदायक ठरेल. बनविल्यापासून ३ महिन्यांपर्यंत या द्रावणाचा प्रभाव उत्तम आहे. या काळानंतर द्रावणाची कीटनाशक शक्ती कमी होत जाते.

वाचा: White Grub Control | हुमणीमुळे पिकाचे नुकसान होतयं? वेळेत ‘असे’ करा हुमणीचे नियंत्रण, जाणून घ्या हुमणीच्या नियंत्रणाची पद्धत

Use | अग्निअस्त्र कशासाठी वापरावे
पिकांच्या शेंगा व फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी हे द्रावण उपयुक्त आहे.१०० लिटर पाण्यात ३ ते ५ लिटर अग्नीअस्त्र या प्रमाणात मिसळून पिकांवर फवारावे.बहुतांशी कीटक व अळ्यांचे श्वसन हे त्वचे मार्फत होत असते. द्रावणातील तिखट अर्क फवारणीद्वारे त्यांच्या त्वचेवर पडताच श्वसनावरोध (श्वसनास अडथळा) होऊन त्या मरतात. त्यामुळे याचा सर्वात जास्त फायदा कीटकनाशकांवरती होईल.

ऋतुजा ल. निकम

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button