ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणारं तीन टप्प्यात; आधार प्रमाणीकरणानंतर ‘या’ तारखेपासून होणार वितरीत

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन आणि ऑफलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत.

वाचा: मायदेशासाठी सोडली परदेशातील नोकरी, आता ड्रॅगन फ्रूट पिकवून कमावतोय लाखो रुपये

तीन टप्प्यांत मिळणार अनुदान
शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाची रक्कम तीन टप्प्यांत मिळणार आहे. या अनुदानासाठी (Lifestyle) पात्र झालेल्या आठ लाख 29 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या ऑफलाईन पाहण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तसेच ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्हाला csc (सीएससी) पोर्टलवर जावे लागेल. ज्यावर तुम्ही तुमच्या याद्या पाहू शकता. तसेच सदर अनुदानासाठी मिळालेली रक्कम बँकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये, या खातर शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाईल.

शेतकऱ्यांना दिलासा! निकषात न बसणाऱ्या नुकसानग्रस्तांसाठी तब्बल 597 कोटींच्या निधी वितरणास मंजुरी

कधीपासून मिळू शकते अनुदान?
सध्या पात्र झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. आता दोन दिवसांमध्ये आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित करण्याची शक्यता आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

वाचा :सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट! पीएम किसानचे 2 हजार ‘या’ तारखेपासून होणार जमा; कृषी मंत्रालयाने दिली माहिती

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान कसे मिळणारं तीन टप्प्यांत?

• शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख
अनुदानची रक्कम – 4,000 कोटी

• शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख
अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी

• शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख
अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will get incentive subsidy of 50 thousand in three phases; After Aadhaar verification, the account will be credited from date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button