lang="en-US"> Ginger Farming | कमी खर्चात बंपर नफा मिळवायचाय? तर - मी E-शेतकरी

Ginger Farming | कमी खर्चात बंपर नफा मिळवायचाय? तर ‘या’ पिकाची करा लागवड

रब्बी आणि खरीप पिकांवर नफा मिळत नसल्याची तक्रार शेतकरी नेहमीच करतात.

Ginger Farming | असे घडते कारण बहुतेक जुने शेतकरी आधुनिक पिकांच्या लागवडीमध्ये (Crop planting) आणि तंत्रात रस दाखवत नाहीत. मात्र, आता शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. अनेक शेतकरी आता नवीन पिके घेऊन चांगला आर्थिक (Financial) नफा कमावत आहेत. शेतकरी बांधवांना पारंपारिक शेती (Agriculture) सोडून नवीन पिकांच्या लागवडीकडे जायचे असेल, तर आल्याची लागवड (Ginger Planting) त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आल्याचा वापर चहापासून भाज्या, लोणच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत होतो. याशिवाय त्याची मागणी वर्षभर राहते. यामुळे आल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच चांगला नफा मिळवण्याची संधी असते.

वाचा: Onion Rate | शेतकऱ्यांना मोठा फटका! कांदा दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आल्याची लागवड कशी करावी?
आल्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. सहपीक तंत्रज्ञानाच्या (Agricultural Technology) आधारेही त्याची लागवड करता येते. हे पपई आणि इतर मोठ्या झाडांमध्ये लावले जाऊ शकते. 6-7 pH असलेली माती लागवडीसाठी चांगली मानली जाते. कृषी तज्ज्ञांच्या मते, एक हेक्टरमध्ये पेरणीसाठी 2 ते 3 क्विंटल आले बियाणे आवश्यक आहे.

आले कसे लावावे?
आले लावताना ओळीपासून ओळीतील अंतर 30-40 सेंमी ठेवावे. तर रोपातील अंतर 25 ते 25 सें.मी. ठेवावे. त्याचे बियाणे पेरणीनंतर हलकी माती किंवा शेणखताने झाकून ठेवावे. याशिवाय शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी.

वाचाआता भारतीय कापसाच्या मार्केटिंगसाठी नवा ब्रँड! शेतकऱ्यांना ‘असा’ होणार फायदा

खर्च व नफा
आले पीक तयार होण्यासाठी 8 ते 9 महिने लागू शकतात. एका हेक्टरमध्ये आल्याचे उत्पादन 150 ते 200 क्विंटलपर्यंत असते. एका हेक्टरमध्ये आले लागवडीसाठी सुमारे 7-8 लाख रुपये खर्च होऊ शकतात. सध्या बाजारात सुमारे 80 रुपये किलोने आले विकले जात आहे. 60 रुपये प्रति किलो असा विचार केला तर एक हेक्टरला 25 लाखांपर्यंत सहज उत्पन्न मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version