ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Profitable Farming |कमी क्षेत्रात बक्कळ पैसा कमवायचा आहे, तर ही शेती करा दररोज मिळेल उत्पन्न…

If you want to earn a lot of money in a small area, then do this farming and you will get daily income

Profitable Farming |सेनगाव तालुक्यातील आजेगाव सुभाष दिवाकर (Subhash Diwakar) या शेतकऱ्याने शेतीमध्ये अनेक प्रयोग (Experiment) केले आहेत. या शेतकऱ्याने वर्षभर दोडक्याची लागवड केली. यातून ते दरोरोज उत्पन्न घेत आहेत. यांची ही शेती लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. निसर्गाच्या लहरीमुळे शेतीमध्ये नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. निसर्गाच्या लहरीमुळे शेतीमध्ये दरवर्षी नुकसान (Loss) होत आहे. मात्र शेतीत थोडे वेगळे प्रयोग केले तर, नक्कीच चांगले उत्पन्न (Income) मिळू शकते.

सुभाष वाघ (Subhash Wagh) यांनी हे दाखवून दिले. सुभाष वाघ यांची ५ एकर शेती आजेगाव येथे आहे. शेतीची आवड असल्याने सुभाष हे शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. दोडका लागवडीचा (Dodka cultivation) त्यांचा प्रयोग शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा आहे. एक एकर शेतीत त्यांनी ड्रिपच्या मदतीने दोडक्याची लागवड केली आहे. यामध्ये प्रत्येक हगामानुसार २ ते ३ लाख रुपये उत्पन्न मिळते. पारंपारिक पिकात उत्पन्नासाठी चार महिने प्रतीक्षा करण्यापेक्षा दररोज उत्पन्न देणारी ही शेती फायद्याची आहे असे, वाघ हे म्हणाले.

वाचा: मोठी बातमी; ग्रेव्हीटी सेपरेटर, बीबीएफ यंत्र, भाजीपाला किट, इ. अनुदान जाहीर, “हे” असतील लाभार्थी..

आंतर पिकातून दोडका उत्पन्न:

शेतात आंतर पिके घेऊन उत्पन्नात वाढ करण्यात आली आहे. दोडका लावलेल्या शेतात या शेतकऱ्याने मिर्ची, पत्ता कोबी, मेथी, कोथिंबीर ही पिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे जवळच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करून उत्पन्नात भर घालता येते. दोडक्याच्या शेतीत मेहनत जास्त घ्यावी लागते. संपूर्ण पिकासाठी ड्रिप केली आहे. दोन चार दिवसाआड फवारणी करावी लागते. अशी माहिती वाघ यांनी दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button