ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Electricity Bill | अर्रर्र…! वीज दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार; लगेच पाहा किती रुपये युनिटने वीज मिळणार

Electricity Bill | राज्यात दुष्काळासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांवर वीज दरवाढीचा डोंगुर कोसळला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने कृषीसह सर्व घटकांसाठी वीज (Electricity Bill) दरवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा धक्का बसला आहे.

६ ते १२ टक्के वीज दरवाढ:
वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे. यामुळे वीज दरात ६ ते १२ टक्के वाढ होणार आहे. यासोबतच स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे.

कृषिपंपांसाठी दरवाढ:
लघु दाब शेती पंपासाठी: २०२२-२३ मध्ये ३.३० रुपये प्रति युनिट दर होता, तो २०२४-२५ मध्ये ४.५६ रुपये प्रति युनिट झाला आहे.

वाचा|तीन गुंठ्यात ७५ पिके! हवामान बदलाशी लढण्याचा यशस्वी प्रयोग!

  • स्थिर आकारातही वाढ:
  • लघुदाब शेती पंपासाठी: २०२२-२३ मध्ये ४३ रुपये प्रति अश्वशक्ती होता, तो २०२४-२५ मध्ये ५२ रुपये प्रति अश्वशक्ती झाला आहे.
  • उच्च दाब शेती पंपासाठी: २०२२-२३ मध्ये ८० रुपये प्रति केव्हीए होता, तो २०२४-२५ मध्ये ९७ रुपये प्रति केव्हीए झाला आहे.

एकत्रित दरवाढ:
लघुदाब शेती पंपासाठी: २० टक्के
उच्च दाब शेती पंपासाठी: २१ टक्के

वीज दरवाढीचे परिणाम:
शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढेल. शेती उत्पादनावर परिणाम होईल. महागाई वाढेल. सामान्य ग्राहकांवरही परिणाम होईल.

शेतकऱ्यांच्या मागण्या:
वीज दरवाढ रद्द करा. शेतकऱ्यांसाठी वीज दरात सवलत द्या. महावितरणची कार्यक्षमता वाढवा. वीज गळती कमी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button