ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Electricity Bill | महावितरण आक्रमक! वीजबिल थकित असणाऱ्या तब्बल 7 हजार 900 शेतकऱ्यांचे तोडलं कनेक्शन

Electricity Bill | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सर्वात मोठी गरज लागते ती विजेची. कारण एकाला पाणी देण्यासाठी विजेची गरज भासते. महावितरणाकडून शेतकऱ्यांना विजेचा (Electricity Bill) पुरवठा केला जातो. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण आणि शेतकरी यांच्यात वीजबिलामुळे वाद सुरू आहे. महावितरणाने विज कापणीचा (Electricity Bill) निर्णय देखील घेतला होता. परंतु वीज कापणमुळे शेतकऱ्यांचे (Farming) मोठे नुकसान होणार होते. तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे अधिक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले होते. पण आता महावितरण आक्रमक झाले, असून शेतकऱ्यांची धडाधड वीज कापणी केली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार थेट 80 टक्के अनुदान, जाणून घ्या कसा मिळणार लाभ

महावितरण आक्रमक
वारंवार विज बिल भरण्यासाठी सूचना देऊन देखील शेतकरी थकित वीज बिलाचा भरणा करत नाहीत. त्यामुळे आता महावितरण आक्रमक झाले आहे. आता महावितरणाने थेट आपली कारवाई सुरू करत थकित वीज बिल (Electricity Bill) असलेल्या शेतकऱ्यांची थेट वीज कापणी सुरू केली आहे. आता ही वीज कापणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती (Agricultural Information) पिकांना मोठा फटका बसणार आहे. कारण विजेशिवाय पिकाला पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नंतर हा दुसरा फटका बसणार आहे.

7 हजार 900 शेतकऱ्यांची तोडली वीज
मोहोळ तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांकडे महावितरणाची थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी वाढत चालली आहे. पण तरीही शेतकरी वीज बिल भरण्याचं नाव घेत नाहीत. जाता महावितरणाने कठोर पाऊल उचलले आहे. थेट थकीत शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी एक मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम तीव्र करत महावितरणाकडून थकीत विजबिल असलेल्या 7 हजार 900 शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनाचे ‘इतके’ कोटी वितरीत; त्वरित तपासा खात्यात पैसे आले का?

शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. तर दुसरीकडे कापूस आणि सोयाबीनला देखील पुरेसा दर मिळत नाहीये. यामुळे देखील शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे आता वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणाकडून वसुलीसाठी थेट केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतीतील पिके जळून खाक होणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Tittle: Aggressive Maha distribution! As many as 7 thousand 900 farmers whose electricity bills are in arrears have been disconnected

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button