ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

केंद्राकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! सूक्ष्म सिंचनासाठी 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ‘इतके’ कोटी

Micro Irrigation | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याचा साठा प्रचंड महत्त्वाचा असतो. त्यासोबतच शेतीतील (Agriculture) पिकाला पाणी देण्यासाठी सिंचनाची गरज भासते. परंतु सिंचनाचा आर्थिक (Financial) खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नसतो. याच कारणास्तव शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आता सूक्ष्म सिंचनाच्या (Micro Irrigation) अनुदानासाठी शेतकऱ्यांना कोट्यवधींचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात सूक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation) शेतकऱ्यांना किती निधी मिळू शकतो.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनाचे ‘इतके’ कोटी वितरीत; त्वरित तपासा खात्यात पैसे आले का?

केंद्राकडून मिळणार कोट्यवधींचा निधी
राज्यातील कृषी विभाग आणि ठिबक कंपन्यांमधील समन्वयामुळे सूक्ष्म सिंचन (micro irrigation) योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणखी 70 हजार शेतकऱ्यांना लवकरच 100 कोटी रुपयांचे अनुदान केंद्राकडून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे केंद्राकडून जबरदस्त गिफ्ट मिळणार आहे. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाची केंद्राकडून 60 टक्के तर राज्याकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.

कशासाठी मिळते अनुदान?
शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेत ठिबक संच, तुषार संच, वर्षा प्रणाली तसेच सॅंड फिल्टर, पाइप, हाड्रो सायक्लोन फिल्टर, फर्टिलायझर्स टॅंक व ड्रीप लाइन वाइंडर याकरता अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पूरक अनुदान देण्यात येते.

वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार थेट 80 टक्के अनुदान, जाणून घ्या कसा मिळणार लाभ

शेतकऱ्यांना अनुदानामुळे आर्थिक दिलासा
शेतकऱ्यांना शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन जास्त फायद्याचं ठरतं. कारण या सूक्ष्म सिंचनामुळे पाणी जास्त वाया जात नाही. त्याचवेळी शासनाच्या माध्यमातून सिंचनासाठी विविध योजनांद्वारे अनुदान दिले जाते. त्याचमुळे शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! As many as crores will be received from the center for micro irrigation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button