ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Kharif season | शेतकऱ्यांनो काळजी करू नका! खरीप हंगामासाठी ‘इतका’ खताचा साठा उपलब्ध

खरिप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना आता बियाण्यांपेक्षा जास्त खतांची चिंता भेडसावत आहे. कारण यावर्षी खतांची (Fertilizer scarcity) टंचाई भासू शकते. याचमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Kharif season | खतांची (Fertilizer) कमतरता भासणार असल्यामुळे शेतीतील (Agriculture) पिकांसाठी विविध पर्याय उपलब्ध केले जात आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे आता 1 जूनपासून खते बियाणे ( Fertilizer seeds) यांच्यास विक्रीला (Sale) सुरुवात होणार आहे. अशातच शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा (Fertilizer shortage) भासेल अशा अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवल्यामुळे व्यापारी लोकांची चांदी होईल याच अनुषंगाने हे काम केले जात आहे. मात्र, आता कृषी विभागाकडून (Department of Agriculture) शेतकऱ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की, शेतकऱ्यांनी याबाबत कसलीच चिंता करू नये. कारण खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक पुरवठा उपलब्ध आहे.

वाचा: Mango | नादचखुळा! शेतकऱ्याने पिकवला ‘या’ जातीचा आंबा, तब्बल दोन ते तीन लाख मिळतोय भाव

दरवर्षी खतांची मागणी
दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकरी शेतीसाठी तब्बल 62 लाख टन खताची खरेदी केली आहे. ज्यामध्ये रब्बी हंगामासाठी 27 लाख टन खतांची खरेदी केली जाते. तर हंगामासाठी शेतकऱ्यांकडून 35 लाख टन खतांची खरेदी ही राज्य शासनाद्वारे केली जाते. त्याचबरोबर गेल्या 50 वर्षांमध्ये शेतकरी नगदी आणि बागायती पिके घेत असल्याने खतांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे.

वाचा: Banana Crop | केळी पिकात भरघोस उत्पन्न हवंय? तर ‘अशा’ पद्धतीने लागवड करून करा व्यवस्थापन

यंदा खतांची करण्यात आली ‘इतकी’ मागणी
यंदा खरीप हंगामामध्ये शेतकरी जवळपास 45 लाख टन खते खरेदी करू शकतात. ज्यातील रब्बी हंगामातील जवळपास 12 लाख टन खते तशीच आहेत. त्याचाच विचार करता आता बाजारामध्ये तब्बल 57 लाखांहून अधिक खते उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. अशी माहिती खुद्द कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button