ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Economic change | 1 जूनपासून होणार ‘या’ गोष्टींमध्ये मोठे बदल, थेट सामान्यांच्या खिशावर परिणाम, तर एलपीजी दरात वाढ?

मे महिना संपत आला असून, जून महिना लवकरच सुरू होणार आहे. जून महिन्याच्या (Changes in early June) सुरुवातीपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर थेट परिणाम करतील.

Economic change | प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही बदल होतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होतो. आता 1 जूनपासून अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. अनेक गोष्टींमध्ये महागाई (Inflation) वाढणार आहे त्यामुळे याचा परिणाम थेट सामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्याचबरोबर घरगुती गॅसच्या (LPG gas) किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यासह रेशन कार्ड (Ration card) धान्य वाटपात (Grain Distribution) देखील 1 जूनपासून मोठा बदल होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 1 जूनपासून नक्की कोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गृहकर्जासाठी बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 7.05 टक्के केला आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील 0.40 टक्क्यांनी वाढून 6.65 टक्के झाला आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार वाढलेले व्याजदर 1 जूनपासून लागू होतील.

ऍक्सिस बँक
ऍक्सिस बँकेने ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सरासरी मासिक शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत, 1 जून 2022 पासून बचत/पगार खात्याची दर रचना बदलली जाणार आहे. ऑटो डेबिटमध्ये प्रवेश नसल्याच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे. ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांना खात्यातील किमान शिल्लक राखता येत नसेल, तर अधिक सेवा शुल्क भरावे लागेल.

वाचा: Bank | आताच करून घ्या बँकेची कामे, जून महिन्यात बँका राहणार 18 दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

थर्ड पार्टी विमा
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 1 जूनपासून कार आणि बाईकचा विमा महाग होणार आहे. थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर तुम्हाला कारच्या इंजिन क्षमतेनुसार प्रीमियम भरावा लागणार आहे. उदाहरणार्थ, आता 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम 2,094 रुपये असेल. 1 जूनपासून दुचाकींच्या विम्याच्या प्रीमियममध्येही वाढ होणार आहे.

वाचा: RTO | आरटीओची मोठी कारवाई! ‘या’ जिल्ह्यातील तीन शोरुमची तपासणी, तर 11 ई-बाईक्स जप्त, जाणून घ्या कारण

रेशन कार्ड धान्य वाटप बदल
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये मोफत उपलब्ध गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. यूपी, बिहार आणि केरळमध्ये 1 जूनपासून आता 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ऐवजी फक्त 5 किलो तांदूळ मिळणार आहे. गव्हाची कमी खरेदी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच गहू मिळत राहतील आणि येथील रेशन वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही.

एलपीजी गॅस
सामान्यांना पासून विविध गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. जे आपण आताच पाहिले आहेत. आता याचबरोबर 1 जूनपासून घरगुती गॅसच्या किमतीत देखील काही बदल होऊ शकतात का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button