ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फळ शेती

Mango | नादचखुळा! शेतकऱ्याने पिकवला ‘या’ जातीचा आंबा, तब्बल दोन ते तीन लाख मिळतोय भाव

भारतीय फळांचा राजा हा आंबा आहे. आंब्याचा हंगाम (Mango season) मुख्यतः उन्हाळा (Summer) असून वेगवेगळ्या जातीच्या आंब्यानुसार त्याचा भाव ठरत असतो.

Mango | संपूर्ण जगात आंब्याच्या 3000 हून अधिक प्रजाती (Mango species) आहेत. त्यामुळे खवय्यांना निवडीची बरीच संधी असते. आंबा ही जगातील सर्वात महागडी प्रजाती मानली जाते. मात्र, आंब्याच्या जातीनुसार त्याची किंमत ठरलेली असते. असाच एका आंब्याचा दर चक्क दोन ते तीन लाख रुपये किलो आहे. हा आंबा जगातील सर्वात महागड्या प्रजातीचा आहे. चला तर मग या आंब्याच्या जातीबद्दल जाणून घेऊया.

‘या’ जातीचा पिकवला आंबा
ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील निलाथर गावातील एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा असलेला मियाझाकी जातीचा आंबा Mangoes of Miyazaki variety) पिकवला आहे. हा आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकवला असून, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या आंब्याचा दर लाखोंच्या घरात आहे. गेल्या वर्षी मियाझाकीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच लाख रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे आंबा शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शेती आहे. हा आंबा शेतकरी चंदू सत्य नारायण यांनी पिकवला आहे.

वाचा: Gac fruit farming| कधी ऐकले का गॅक फळ ? गॅक फळाची शेती करून शेतकरी नक्कीच होईल मालामाल…

कृषी संचालकांनीही केले कौतुक
सत्य नारायण यांनी मियाझाकी आंब्याची कोय बांगलादेशातून आणली आहे. या झाडाचे संगोपन चांगल्या पद्धतीने केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, राज्याचे सहाय्यक कृषी संचालक वासुदेव प्रधान यांनी सत्य नारायण यांचे कौतुक केले आहे.

वाचा: Mango Cultivation | योग्य लागवड पद्धत देईल दुप्पट उत्पादन ! जाणून घ्या आंबा लागवड तंत्रज्ञान..

आंब्याची खासियत
मियाझाकी आंब्याचे वजन 900 ग्रॅम पर्यंत असते. हा आंबा पिकतो तेव्हा तो हलका लाल आणि पिवळा रंगाचा होतो. या आंब्याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये फायबर आढळत नाही. तसेच, खायला हा आंबा खूप गोड असतो. हे आंबे जपानमधील क्युशू प्रांतातील मियाझाकी शहरात सुरक्षित वातावरणात पिकवले जातात. त्यामुळे त्याला मियाझाकी हे नाव पडले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअ‍ॅपवर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button