ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Distribution Of Sarees | आचारसंहिता लागू झाल्याने अंत्योदय लाभार्थ्यांना साड्यांचे वितरण थांबले

Distribution Of Sarees | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने अंत्योदय लाभार्थ्यांना साडीचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी साड्या व रेशन घेण्यासाठी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात वेळ गेल्याने १५ दिवसांपूर्वी तालुकास्तरावर या साड्या उपलब्ध( Distribution Of Sarees) झाल्या होत्या.

आता आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीच्या लाभार्थ्यांना साड्या वाटप न करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना दिले आहेत. तसेच प्रशासनातर्फे साडीची एन्ट्री पॉस मशिनमध्ये करण्यात आली होती. मात्र, आता आचारसंहितेमुळे एन्ट्री काढून टाकण्यात आली आहे.

त्यामुळे दुकानदार साडीचे वितरण करून शकणार नाहीत. तसेच पिशव्याही वितरित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रामटेक तालुक्यात १२ हजार १३४ अंत्योदय आणि १९ हजार ६७३ प्राधान्य लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना तालुक्यातील ११२ रेशन दुकानातून विविध योजनाचा लाभ मिळत असतो.

वाचा| मतदार कार्ड गमावलंय? काळजी करू नका, घरबसल्या मिळवा नवीन e-EPIC!

आचारसंहितेच्या काळात येणाऱ्या सणोत्सवामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. पूर्वी यासाठी राज्य शासनाकडून पिशवी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र त्या पिशव्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदीचे फोटो असल्यामुळे आचारसंहितेमध्ये त्यांचा वापर टाळण्यात येत आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा आणण्यासाठी घरून पिशवी आणावी लागणार आहे.

आचारसंहिता असल्याने रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या वस्तूवर सत्ताधारी लोकांचे छायाचित्र असेल तर आदर्श आचारसंहिता भंग होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात याची पुरेशी माहिती नसल्याने वादंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title | Distribution Of Sarees | The distribution of sarees to Antyodaya beneficiaries stopped after the implementation of the code of conduct

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button