ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Wheat Blast| शेतकऱ्यांनो सावधान, गव्हावर पडतोय ‘हा’ खतरनाक रोग; जगावर अन्नसुरक्षेचं संकट

Wheat Blast| गव्हाशिवायच्या जगाची कल्पना करता येणंच अशक्य. जगात सगळ्यात जास्त मागणी आहे ती गव्हाला. जर गहूच संपला तर? काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र गव्हावर पडणाऱ्या तांबेरा या रोगापेक्षा भयानक असा रोग आला आहे ज्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दक्षिण अमेरिकेत अनेक भागात पहिल्यांदाच गहू पिकावर मॅग्नापोर्ट ओरिझे या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या बुरशीमुळे गव्हावर व्हीट ब्लास्ट (wheat blast) या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

संशोधन काय सांगतं?

११ एप्रिल २०२३ रोजी प्लॉस बायोलॉजी जर्नलमध्ये या रोगा संबंधीचं संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यानुसार संशोधकांनी व्हीट ब्लास्ट या रोगाच्या मॅग्नापोर्ट ओरिझे बुरशीच्या नमुन्यांचं जीनोमिक विश्लेषण केलं. त्यामध्ये असं दिसून आलं की ही बुरशी एकाच कुटुंबातील आहे. मॅग्नापोर्ट ओरिझे बुरशी भात आणि गहू अशा पिकांमध्ये लवकर पसरते. जर या बुरशीनं पिकामध्ये शिरकाव केला की पूर्ण पीक जाळून टाकण्याशिवाय पर्याय उरत नाही. असा हा भयानक रोग आहे. मात्र या रोगाची सुरुवात आणि प्रसार कसा झाला याचा निश्चित पत्ता अजून लागलेला नाही. तसंच यावर काय उपाययोजना करता येतील याविषयी जगभरातील संशोधक शोध घेत आहेत. या रोगामुळं जगातील गहू उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याचं ब्रिटनमधील नॉर्विच येथील सेन्सबरी लॅबोरेटरीतील वनस्पती पॅथॉलॉजिस्ट निक टॅलबोट यांनी सांगितलं आहे.

जगभरात प्रसार

80 च्या दशकात ब्राझीलमध्ये गव्हावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर ही बुरशी संपूर्ण दक्षिण अमेरिकेत पसरली. बांगलादेशात 2016 मध्ये या व्हीट ब्लास्ट बुरशीजन्य रोगाचा पहिल्यांदा उद्रेक झाला होता. यामुळं बांग्लादेशात गहू उत्पादनात तब्बल 51 टक्के इतकी घट झाली होती. यानंतर झांबियातील गव्हावर या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. यानंतर आता दक्षिण अमेरिकेत या बुरशीचा वेगानं फैलाव होताना दिसत आहे. शास्त्रज्ञांनी 71 नमुन्यांचे स्वतंत्र जीनोम सिक्वेंसिंग केलं आहे. बांगलादेश आणि झांबियामध्ये आढळलेल्या गव्हातील बुरशीजन्य रोगाचे जिवाणू हे दक्षिण अमेरिकेत अढळलेल्या रोगाचेच असल्याचे सिद्ध झालं आहे. माणसाकडूनच या रोगाच्या जिवाणूचा प्रसार होत असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

काय होणार परिणाम

या बुरशीच्या फैलावामुळे जगभरातील गव्हाच्या सरासरी उत्पादनात 21 टक्क्यांपेक्षा अधिकची घट होऊ शकते. हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील वाढ यामुळं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, यामुळं जगावर अन्नसुरक्षेचं संकट निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. अशाप्रकारचे विघातक रोग, बुरशी, कीड आणि वातावरणातील बदल यांच्या परिणामांमुळे कोट्यवधी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच व्हीट ब्लास्ट या बुरशीजन्य रोगावर तातडीनं प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. गव्हाशिवायच्या जगाची कल्पना करता येणं शक्य नाही.

वाचाशिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र

वाचाआता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button