ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Namo Shetkari Maha sanman| मे अखेर राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार दोन हजार रुपये, यासाठी काय करावं लागणार, वाचा सविस्तर

Namo Shetkari Maha sanman| केंद्र सरकारनं 2022 या सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. मात्र तसं काही झालेलं नाही. तरीसुद्धा यातील एक टप्पा म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. या अंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. प्रत्येकी चार महिन्यानंतर दोन हजार रुपये मिळतात. याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकरी कुटुंबाला आणखी सहा हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजे केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारचे 6 हजार असे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये शेतकरी कुटुंबाला मिळणार आहेत.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

काय आहे नमो शेतकरी महासन्मान योजना

यावर्षी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली. केंद्र सरकारच्या पीएम सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारचे 6 हजार असे मिळून 12 हजार रुपये मिळणार आहेत. पीएम सन्मान निधीचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

असे आहेत निकष

पीएम किसान सन्मान निधीचे जे निकष आहेत तेच निकष राज्य सरकारच्या योजनेसाठी असणार आहेत. सरकारी नोकरदार, इन्कम टॅक्स भरणारे आणि लोकप्रतिनिधी या योजनेसाठी अपात्र आहेत. तसेच ज्यांची जमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी ई केवायसी करावी लागेल. मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असावयास हवा आणि लाभार्थ्यांना आपल्या मालमत्तेची माहिती द्यावी लागणार आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

कधी मिळणार पहिला हप्ता

नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. योजना राबवण्यासंबंधीचा सूचना आराखडा कृषी विभागानं सरकारला सादर केला आहे. त्यामुळं मे महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकारच्या हप्त्यासोबतच राज्य सरकारचा हप्ताही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र राज्यातील बारा लाख शेतकऱ्यांनी वर उल्लेख केलेले निकष पूर्ण केलेले नाहीत त्यामुळे त्यांना केंद्राच्या योजनेचे काही हप्ते मिळाले नव्हते. त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button