ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Dams Water Shortege | उजनी धरणाची चिंताजनक स्थिती; यंदा तळ गाठण्याची शक्यता

Dams Water Shortage | Alarming condition of Ujani Dam: likely to bottom out this year

Dams Water Shortege | उजनी धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. धरणाची पातळी उणे ३६ टक्क्यांवर पोहोचली असून, बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठा योजनांसाठी दर आठ दिवसांनी अंदाजे एक टीएमसी पाणी खर्च होत आहे.

जूनअखेर किंवा जुलैमध्येच पाऊस पडत असल्यामुळे, यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे ७० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१५-१६ मध्ये धरण उणे ६० टक्के पर्यंत (Dams Water Shortege) खाली गेलं होतं, पण यंदाची परिस्थिती त्यापेक्षाही वाईट होण्याची शक्यता आहे.

वाचा|भारताची लाडकी स्कूटर आता इलेक्ट्रिक रूपात! – होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक येत आहे!

दुष्काळ आणि पाण्याची टंचाई:

  • सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.
  • उर्वरित तालुक्यांमध्येही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
  • जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या दीड टीएमसीपेक्षाही कमी पाणी आहे.

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा:

  • १५ मे पर्यंत सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून ६ ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
  • मेअखेर धरणातील अंदाजे १५ टीएमसी पाणी संपेल.
  • जुलैमधील आषाढी वारीसाठी अडीच टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागेल.
  • त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल.

उजनी धरणाची पातळी उणे ७० टक्क्यांपेक्षाही खोलवर जाण्याची शक्यता आहे.

हे सर्व परिस्थिती लक्षात घेता, पाण्याचा दुरुपयोग टाळणं आणि पाणी वाचवणं गरजेचं आहे.

Web Title | Dams Water Shortage | Alarming condition of Ujani Dam: likely to bottom out this year

हे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button