ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Loan | मोठी बातमी ! केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १० मिनिटात शेतकऱ्यांना मिळेल १.५ लाख रुपये कर्ज!

Crop Loan | Big news! A big announcement from the center for farmers! Farmers will get a loan of Rs 1.5 lakh in 10 minutes!

Crop Loan | लोकसभा निवडणुका जवळ येत असताना केंद्र सरकार शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी एका पथदर्शी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून १.५ लाख रुपये कर्ज (Crop Loan ) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे कर्ज किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲपच्या मदतीने अवघ्या १० मिनिटात उपलब्ध होणार आहे. देशातील उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील फारुखाबाद आणि बीड जिल्ह्यांत हा पथदर्शी कार्यक्रम राबवला जाणार आहे.

काय आहे पथदर्शी कार्यक्रम?

देशातील शेतकऱ्यांना सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा व्हावा आणि बँकांच्या जाचक अटीतून त्यांना मुक्तता मिळावी, यासाठी हा पथदर्शी कार्यक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद आणि महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲपचा वापर केला जाणार आहे.

वाचा | POCRA Scheme | ब्रेकींग! ‘पोकरा’ योजनेअंतर्गत ८ हजार २४५ शेतकऱ्यांना मिळणारं तब्बल ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान

अवघ्या दहा मिनिटांत कर्ज

या पथदर्शी कार्यक्रमाद्वारे फारुखाबाद आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा (Crop Loan ) केला जाणार आहे. यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲपचा उपयोग केला जाईल.

यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या १० मिनिटांत १.५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणतेही तारण ठेवावे लागणार नाही.

पिकांची अचूक माहिती

किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲपच्या माध्यमातून देशातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जाणार आहे. तसेच ॲग्री स्टॅक ॲपमध्ये येत्या खरीप हंगामापासून देशातील सर्व पिकांची माहिती नोंदविण्यात येणार आहे. यामुळे देशातील सर्व पिकांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मे महिन्यापासून सुरुवात

या पथदर्शी कार्यक्रमाचा श्रीगणेशा मे महिन्यापासून दोन्ही जिल्ह्यात केला जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा

केंद्र सरकारच्या या पथदर्शी कार्यक्रमामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि त्यांना वेळेवर कर्ज मिळू शकेल.

Web Title | Crop Loan | Big news! A big announcement from the center for farmers! Farmers will get a loan of Rs 1.5 lakh in 10 minutes!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button