ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतरताज्या बातम्या

Electric Vehicles | इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणे होणार आता आणखी सोप्पे; राज्यसरकार देणार १.५ लाखांपर्यंतचे प्रोत्साहन…

Electric Vehicles | दिवसेंदिवस वाढत चाललेली इंधन वाढ आणि प्रदूषण यामुळे संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना (electric vehicle) अधिक पसंती दिली जात आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती जास्त असल्याने खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहन घेणं आवाक्याबाहेर वाटत आहे. यामुळेच भारतात केंद्रसरकार (central Goverment) इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये सुधारित महाराष्ट्र इव्ही धोरण २०२१ मध्ये जाहीर झाले होते. या धोरणानुसार ईव्हींना नोंदणी शुक्ल आणि रोड करातून सवलत देण्यात आली असून राज्याला इलेक्ट्रिक वाहनांचे भारतातील सर्वोच्च उत्पादक बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान

महाराष्ट्र राज्य ३१ मार्च पूर्वी ३ kWh बॅटरी असलेली इलेक्ट्रिक बाईक घेणाऱ्या व्यक्तीसाठी १५ हजार रुपयांपर्यंतचा अर्ली बर्ड बोनस देत आहे. इलेक्ट्रिक कारसाठी ३० kWh पर्यंत बॅटरी क्षमता सवलती साठी पात्र असून यासाठी एकूण रु. १.५ लाख पर्यंतचे प्रोत्साहन मिळते. ३१ मार्चपूर्वी खरेदी करणाऱ्यांना १ लाख रुपयांच्या अतिरिक्त प्रोत्साहानासह अनुदान मिळत आहे.

२५०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग (Charging) असणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने पुढील चार वर्षात सात शहरांमध्ये २,५०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य राज्याने ठेवले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने वापरणे हे सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button