ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | मोदी सरकार ‘या’ योजनेंतर्गत तुमच्या खात्यात करणार दरमहा 5 हजार रुपये, त्वरित करा नोंदणी

Yojana | केंद्र सरकारकडून अनेक विशेष योजना चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला एका अशा सरकारी योजनेबद्दल (Government Scheme) सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या म्हातारपणात देखील कमावत राहाल. कोणतेही काम न करता तुमच्या खात्यात (Financial) पैसे येत राहावेत अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या सरकारी योजनेचा (Yojana) लाभ घेऊ शकता. शेतकऱ्यांसाठी (Agriculture) देखील ही योजना फायदेशीर ठरत आहे.

दर महिन्याला खात्यात येतील पैसे
या सरकारी योजनेत तुम्हाला दरमहा 1000 ते 5000 रुपयांचा लाभ मिळेल. केंद्र सरकार दरमहा तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (Transactions) करू इच्छित असल्यास, तुम्ही आता या योजनेत नोंदणी करू शकता. या सरकारी योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळतील.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक विम्यासाठी 72 तासांची अट रद्द का बंधनकारक? जाणून घ्या सविस्तर

कोण घेऊ शकतं लाभ?
शकतो 18-40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. तुम्हालाही पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यात खाते उघडू शकता. या व्यतिरिक्त, या योजनेमध्ये तुम्हाला आयकर कलम 80CCD अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

कसे खाते उघडता येईल?
केंद्र सरकारने याआधी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही योजना सुरू केली होती. पण नंतर त्याची लोकप्रियता पाहता सरकारने 18 वर्षापासून ते 40 वर्षांपर्यंतच्या सर्वांसाठी ही योजना सुरू केली आहे. उघडले होते. या योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडू शकता.

वाचा: आनंदाची बातमी! ‘या’ लोकांना मिळणार दरमहा 10 हजार रुपये, जाणून घ्या कोण असतील पात्र

किती गुंतवणूक करावी लागेल?
जितक्या लवकर तुम्ही या सरकारी योजनेत गुंतवणूक सुरू कराल, तितकाच तुम्हाला फायदा होईल. वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. यासोबत तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये मिळतील. तसेच 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी 42 रुपये, 2000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Modi government will deposit 5 thousand rupees per month in your account under this scheme, register immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button