ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Influenza | देशात कोरोना-इन्फ्लूएंझाची दहशत! वाढत्या प्रकरणांवर आरोग्य मंत्रालयाकडून अॅडव्हायजरी जारी, जाणून घ्या सविस्तर

Influenza | देशात कोरोना आणि इन्फ्लूएंझाची (Influenza) प्रकरणे वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयाने अॅडव्हायजरी जारी केली आहे.

Influenza | देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत केंद्र सरकार सतर्क आहे. देशभरात कोरोनाचे 8601 पॉझिटिव्ह रुग्ण (Influenza) आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR ने राज्यांसाठी संयुक्त सल्लागार जारी केला आहे. जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायझरीनुसार, फेब्रुवारीच्या मध्यापासून, केरळमध्ये 26.4%, महाराष्ट्रात 21.7%, गुजरातमध्ये 13.9%, कर्नाटकात 8.6% आणि तामिळनाडूमध्ये 6.3% कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्याच वेळी, (Influenza) इन्फ्लूएंझा-ए H1N1 आणि H3N2 बद्दल सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

देशभरात मॉक ड्रील घेण्यात येणार..
केंद्राने जारी केलेल्या सल्ल्यानुसार, 10 आणि 11 एप्रिल रोजी देशभरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत. यादरम्यान, मॉक ड्रिलमध्ये रुग्णालयांची व्यवस्था, औषधांची उपलब्धता, खाटा, आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्सिजनसह मनुष्यबळ आणि लसीकरण कव्हरेज यावर लक्ष केंद्रित केले जाईल. याबाबत 27 मार्च रोजी होणाऱ्या व्हर्च्युअल बैठकीत राज्यांना मॉक ड्रिलची अचूक माहिती दिली जाणार आहे.

ॲडव्हायजरी जारी
• गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
शिंकताना अथ‍वा खोकताना • रुमाल/टिश्यूचा वापर करावा.
• नागरिकांनी गर्दीच्या आणि कोंदट ठिकाणी मास्कचा वापर करावा.
• हाताची स्वच्छता राखावी.
• सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.

कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा दिला सल्ला
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांच्या मते, ज्या राज्यांमध्ये कोविडची प्रकरणे वाढली आहेत, त्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच आधीच जारी केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Corona-influenza panic in the country! Health Ministry issues advisory on rising cases, know more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button