ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या आता विक्री करावी का नाही?

Soybean Rate | सध्या बाजारात सोयाबीन आणि कापसाची विक्री सुरू आहे. सोयाबीन आणि कापसाला (Cotton Rate) मागच्या दिवसांत चांगले दर मिळाले. खरं तर, देशातील सोयाबीनच्या हंगाम दीड महिन्यांपासून सुरू झाला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतीतील (Agriculture) सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत देण्यात आली आहे. तर काही शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.

मात्र, सोयाबीनच्या दरामुळे (Soybean Rate) शेतकरी विक्रीसाठी संभ्रमात पडले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सोयाबीनला सध्या किती दर मिळतोय आणि शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) सोयाबीनची विक्री आता करावी का नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केल्यानंतर फायदा होईल.

वाचा: शेतकऱ्यांची राणी सहजच दारात! 24 तासात महिंद्रा बोलेरो एसयूव्ही घरी आणा फक्त ‘इतक्या’च लाखात

सोयाबीन दराची स्थिती
दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर दबावातच होते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतीतील (Agricultural Information) सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे बाजारात सोयाबीनला चांगला दरही मिळत नव्हता. तर गेल्या दोन आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या दरात (Soybean Market) सुधारणा झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

वाचा: कुक्कटपालनाचं काय घेऊन बसला राव? ‘या’ 2 ते 3 पक्षापासूनचं करा मोठा व्यवसाय; जाणून घ्या पैशांवाला कृषी व्यवसाय

सोयाबीनची विक्री करावी की नाही?
सध्या सोयाबीनचा सरासरी दर हा 5 हजार 400 ते 5 हजार 800 रुपयांच्या जवळपास आहे. दिवाळीपूर्वी इतकाही दर सोयाबीनला मिळत नव्हता. सध्याची दराची स्थिती आणि मागणी पाहता सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीसाठी घाई करू नये. बाजारात आवक कमी झाल्यास दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी चांगला दर मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for farmers! Soybeans are getting price, know whether to sell now or not

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button