lang="en-US"> अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 35 टक्के अनुदान, ‘या' जिल्ह्यातील - मी E-शेतकरी

Subsidy | अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 35 टक्के अनुदान, ‘या’ जिल्ह्यातील अर्ज प्रक्रिया सुरू

शेतकऱ्यांना व सामान्यांना सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.

Subsidy | तेल घाणा, गूळ, डाळ उद्योगासह नाशवंत शेतमालांवर प्रक्रिया उद्योगांसाठी 10 लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चासाठी 35 टक्के अनुदान (Subsidy) देणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना होय. याच योजनेबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आता या योजनेंतर्गत नवीन अर्ज (Application) मागवण्यासाठी आता सुरू झाली आहे. 2022-23 चे प्रस्ताव या योजनेतंर्गत (Yojana) स्वीकारायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतमाल (Agriculture) पिकवले जातात. परंतु मार्केट न मिळाल्यामुळे बऱ्याच वेळेस नाशिवंत शेतमालाचे नासाडी होते. मार्केट दूर असल्यामुळे शेतकऱ्यांना ते माल मार्केटला पाठवायला परवडत नाही.

उद्योग व्यवसाय
बरेच शेतकरी ज्यांकडे शेतमाल असुनही नवीन उद्योग व्यवसाय (Business) सुरू करू शकत नाही. काही बेरोजगार तरुण किंवा काही शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्याकडे शेतमाल असूनही आर्थिक (Financial) पाठबळ नसल्यामुळे ते प्रक्रिया उद्योग सुरू करू शकत नाही. अशा नासाडी होणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल त्यावर काही प्रक्रिया व्हावी. याचबरोबर उद्योजकांना बेरोजगार तरुणांना स्वतःचे रोजगार मिळावा आणि व्यवसाय सुरू करता यावा. या दोन्हीची सांगड घालण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया (PM Micro Food Processing) उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी करण्यासाठी 35 टक्केपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते.

वाचा: Sugarcane | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीचे 31 हजार कोटी खात्यावर जमा, जाणून घ्या किती टक्के दिली रक्कम

किती दिलं जातंय अनुदान?
यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे पिकं (Crop) वेगवेगळे फळं घेण्यात आली आहे. लातूरमध्ये तेलगाना, डाळ उद्योग, गुळ उद्योग अशा प्रकल्पासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यासाठी बाजरी तर औरंगाबादसाठी मका अशाप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी पिके घेण्यात आली आहेत. नाशवंत शेतमालाच्या उद्योगासाठी 10 लाखांपर्यंत प्रक्रिया उद्योग उभारू शकता. ज्यासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते.

वाचा: Fisheries | शेतकऱ्यांनो कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी करा मत्स्यपालन, ‘या’ योजनेंतर्गत सरकार देतय 60 टक्के अनुदान

प्रशासनाकडून अर्जाची मागणी सुरू
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र 2020 आणि 2021 मध्ये अव्वल स्थानावर होता. 7000 अर्जांपैकी महाराष्ट्रातून तब्बल 2 हजारांहून अर्ज करण्यात आले होते. ज्यातील 800 अर्ज मंजूर करण्यात आले होते. या योजनेंतर्गत लातूर प्रशासनाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version