ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

बिग ब्रेकिंग! आता ‘या’ प्रवर्गातील नागरिकांना मिळणार 10 टक्के आरक्षण; सर्वोच्च न्यायालयाकडून 103 वी घटनादुरुस्ती वैध

Supreme Court | सामान्य नागरिकांचा विकास व्हावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करते. तसेच भारतीय संविधानामध्ये (Constitution of India) देखील सामान्य नागरिकांना विविध प्रवर्गातील नागरिकांना आरक्षण देऊन त्यांना विकासाच्या (Financial) वाटचालीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत आवश्यकतेनुसार आणि विचारपूर्वक संविधानातील घटनादुरुस्ती करण्यात आल्या आहेत. आता आज देखील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वाचा: कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले कांद्याचे दर; जाणून घ्या किती मिळतोय सर्वाधिक दर?

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक (Finance) आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय देण्यात आला आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ याबाबत निकाल देण्यात आला आहे. 103 वी घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारने दिलेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने वैध ठरवले आहे. न्यायालयाने पाच न्यायमूर्तींच्या घटनापीटाने हा निर्णय घेऊन ऐतिहासिक निकाल दिला आहे.

वाचा: देशातील ‘या’ राज्यांत होणार मेघगर्जनेसह जोरदार पाऊस! शाळांनाही सुट्टी जाहीर; हवामान विभागाचा इशारा

का करण्यात आली घटनादुरुस्ती?
भारतीय संविधानात सामाजिकदृष्ट्या मागास जाती-जमातींना आरक्षणासाठीची तरतूद केलीय. मात्र, यानंतर देशात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना आरक्षण देण्याची मागणी केली जात होती. त्याचवेळी 2019 मध्ये केंद्र सरकारकडून सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. याचसाठी 103 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे.

कशाप्रकारे दिला निर्णय?
या आरक्षणाबाबत निर्णय देताना घटनापीठातील न्यायमूर्तींकडून 4 वेगवेगळी निकालपत्रे देण्यात आली आहेत. याच पाचपैकी 4 न्यायमूर्तींनी ईडब्ल्यूएस आरक्षण योग्य असल्याचा निकाल दिला आहे. त्याचवेळी न्यायमूर्ती रविंद्र भट यांनी या आरक्षणाला अहसमती दर्शवली आहे. आता 4 न्यायमूर्तींनी या आरक्षणाला सहमती दर्शवल्याने शिक्षण व नोकऱ्यांमधील आर्थिक दुर्बलांच्या 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Now category citizens will get 10 percent reservation; 103rd Constitutional Amendment Validated by Supreme Court

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button