ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather| चक्राकार वाऱ्यांची स्थिती झाली निर्माण: महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तर जारी केलं येलो अलर्ट..

पावसाची शक्यता दर्शवली –

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजांसह पाऊस सुरू आहे. आज ( ता.२० ) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता(Agricultural Information) दर्शवली आहे . उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्ह असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

वाचा: तुमच्या खात्यावर पोहचले नाहीत 2 हजार रुपये..? नसतील पोहचले तर करा या नंबरवर फोन

येलो अलर्ट –

कोकण भागातील रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागात विजांसह (Agricultural Information) पावसाचा इशारा . तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये नगर , पुणे , सोलापूर , सातारा , सांगली , कोल्हापूर यांना येलो अलर्ट ची दक्षता.

बंगालच्या उपसागरात तयार होतय मोठ चक्रीवादळ: या ठिकाणी पावसाच्या जोर राहणार कायम; घ्या आपल्या पिकांची काळजी…

चक्राकार वाऱ्यांची स्थिती –

उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व मध्ये अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ उंचीवर चक्राकर वाऱ्याची स्थिती , त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला . बंगालच्या उपसागरात(Agricultural Information) उत्तर अंदमान समुद्र लागत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे . ही प्रणाली वायव्ये कडे सरकताना शनिवार पर्यंत ( या. २२) आणखी तीव्र होईल . सोमवार पर्यंत ( ता. २४ ) बंगालच्या उपसर्गात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची संकेत आहेत .

वाचा: ब्रेकिंग न्यूज: प्रोत्साहन अनुदानास आज शुभारंभ: कोणत्या वर्षी कर्ज घेतलेले शेतकरी असणार आहेत लाभार्थी? तर निकष ही पहा…

विदर्भातून सुद्धा पाऊस परतला –

नैऋत्य मौसमी वाऱ्यांचे परतीच्या प्रवासात शनिवारी संपूर्ण बिहार , सिक्कीम , मेघालय , मध्य प्रदेश , आसाम , त्रिपुरा पश्चिम बंगालचे काही भाग छत्तीसगड , विदर्भसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून (Agricultural Information) माघार घेतला आहे. आज संपूर्ण पश्चिम बंगाल , संपूर्ण ईशान्य , भारत छत्तीसगड , महाराष्ट्र , झारखंडच्या आणखी ओरिसाच्या काही भागांचे बहुतांंच भारतातून माघारीचे शक्यता आहे .

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A condition of cyclonic winds has arisen: Yellow alert has been issued for heavy rains at ‘this’ place in Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button