ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop insurance | बिग अपडेट: पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासात पीकविमा योजनेकडे करा तक्रार; नाहीतर नाही मिळणार पीकविमा; पहा कस कराल तक्रार…

Crop insurance: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural calamity) व काढणीपश्चात नुकसान (Post Harvesting Damage) या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस (Crop Damage Intimation) देणे अनिवार्य आहे.

त्याचप्रमाणे तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी काही ठराविक बाबी लक्षात घेऊनच आवाहन करावे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. श्री. डाबरे यांनी म्हटले, की सोयाबीन, मका आणि ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी Crop Insurance App वर नुकसानीबाबत तक्रार दाखल करतेवेळी काढणीपश्चात नुकसान (Insurance)या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करून पिकांची स्थिती नमूद करणे अनिवार्य आहे.

वाचा: तुमच्या खात्यावर पोहचले नाहीत 2 हजार रुपये..? नसतील पोहचले तर करा या नंबरवर फोन

नुकसानीची माहिती भरतेवेळी घ्या ही काळजी:
Standing Crop Harvested आणि Cut & Spread Bundled For Drying या पर्यायापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडावा.

एकूण क्षेत्रापैकी शंभर टक्के क्षेत्र नमूद करणे गरजेचं आहे.

कापूस आणि तुरीचे नुकसान झाल्यास स्थानिक आपत्ती या जोखीमेच्या अंतर्गत तक्रार दाखल करावी.

पिकाची स्थिती (Status Of Crop At The Time Of Incidence) Standing Crop हा पर्याय निवडावा.
नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करावी.

प्रत्येक गटातील प्रत्येक पिकांसाठी (Insurance)स्वतंत्रपणे तक्रार दाखल करावी.

तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.

सदरील तक्रार क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Update: In case of crop damage, report to crop insurance scheme within 72 hours; Otherwise you will not get crop insurance; See how to complain…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button