ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | तुमच्या खात्यावर पोहचले नाहीत 2 हजार रुपये..? नसतील पोहचले तर करा या नंबरवर फोन

PM Kisan | केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या(Agricultural Information) खात्यात ट्रान्सफर केलाय. गेल्या वेळी जिथ 10 कोटींपेक्षा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते, यावेळी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले आहेत.

2 कोटी 62 लाख शेतकरी बाराव्या हप्त्यापासून वंचित राहिलेत. उत्तर प्रदेशात सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता मिळालेला नाही. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने यूपीतील ज्या शेतकऱ्यांना पैशांचा 12 वा हप्ता मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांचा (Agricultural Information)प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक नंबर दिलाय. जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या 12 व्या हफ्त्याचे पैसे मिळण्यास मदत होईल.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विमा 2022 साठी 14 जिल्हे पात्र; ‘या’ दिवसापासून होणार वाटप

पंतप्रधान किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी(Agricultural Information) उत्तर प्रदेश सरकारने टोल फ्री नंबर जाहीर केलाय. या क्रमांकावर फोन करून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर उत्तरं मिळू शकतात. उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विकास ब्लॉकमध्ये शासकीय कृषी बियाणे स्टोअरमध्ये हेल्पडेस्कही उभा करण्यात आलाय.

सरकारकडून शेतकऱ्यांना आज मिळणार दिवाळीचं गिफ्ट! खात्यात जमा होणार 12वा हप्ता; कृषी मंत्रालयाची माहिती

या टोल फ्री नंबरवर फोन करून समस्यांवर उपाय शोधा:
उत्तर प्रदेशातील शेतकरी 18001801488 टोल फ्री क्रमांकावर फोन करून अनेक समस्यांवर उपाय शोधू शकतात. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी (Agricultural Information)अनिवार्य ई-केवायसी करावं असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे.

वाचा: अखेर समजल हा! ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय योजना; जाणून घ्या सविस्तर बातमी…

खालील मेल आयडीवर देखील तक्रार नोंदवू शकता:
खात्यापर्यंत 12 वा हप्ता पोहोचला नाही तर पीएम किसान योजना 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय [email protected] ई-मेल आयडीवरही तुम्ही तुमची तक्रार मेल करू शकता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना (Agricultural Information)वार्षिक 6 हजार रुपये देतय. एका वर्षात दोन हजार रुपये ही रक्कम तीन हप्त्यात दिली जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: 2 thousand rupees did not reach your account..? If not, call this number

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button