ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land 7/12 | जमिनीच्या सातबाऱ्यात मोठा बदल! आता जमिनीचेही मिळणार आधार कार्ड, शेतकऱ्यांना होणार फायदा

Land 7/12 | आपल्या शेत जमिनीचा मोठा आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा होय. आता याच सातबारा कागदपत्रात मोठा बदल झाला आहे. जो तुम्ही समजून घेणे प्रचंड महत्त्वाचे आहे. आता तुमच्या शेतजमिनीचा (Agriculture Aadhar Card) आधार कार्ड क्रमांक मिळाला आहे. तुमच्या शेत (Agriculture) जमिनीच्या सातबाऱ्यावर जमिनीचा सर्वे नंबर ईमेल पिन प्रिंट होऊन यायला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनीला युएल पिन देण्यात येणार आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: काय सांगता? गव्हाच्या ‘या’ केवळ 120 दिवसांत होणार उत्पादनास तयार

आधार कार्डचा काय होणार फायदा?
राज्यातील नागरी आणि शहरी भागातील जमिनींना प्रॉपर्टी नंबर देण्यासाठी जमिनींना (Agriculture Information) आधार कार्ड देण्यात येणार आहे. जमिनीची ओळख पटवण्यासाठी, जमिनीची (Agricultural) मालकी, जमीन डिजिटल स्वरूपात समजून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जमिनीला हा युएल पिन नंबर देण्यासंबंधातील सूचना देण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या आधार कार्डमुळे जमिनीची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळणे शक्य होणार आहे.

वाचा: पुढील तीन दिवसांत ‘येथे’ बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

जमिनीला मिळणार क्यूआर कोड
त्याचबरोबर जमिनीला क्यूआर कोड स्कॅन देखील देण्यात येणार आहे. हा कोड स्कॅन करताच संबंधित सर्व्हेनंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान कोठे आहे, याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. यामुळे जमिनीची मोजणी अचूक होणार आहे. याच कारणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात येत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाकरून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यानंतर क्यूआर कोड दिला जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big change in the land tenure! Now the land will get Aadhaar card, farmers will benefit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button