ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

World Cancer Day | कर्करोग रुग्णांसाठी ‘या’ योजनांतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत, जाणून घ्या सविस्तर

World Cancer Day | भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. देशात बचत, आरोग्य आणि शिक्षणासाठी विविध योजना उपलब्ध आहेत. त्याच प्रकारे, आरोग्य मंत्रालय कर्करोगाने (Cancer) ग्रस्त रुग्णांसाठी अनेक योजना प्रदान करते. त्यामुळे या गंभीर आजाराने ग्रस्त लोक मोफत उपचार (Financial) आणि इतर अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त (World Cancer Day) आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल सांगणार आहोत.

राष्ट्रीय आरोग्य निधी
ही योजना 1997 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केली होती. योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना आर्थिक (Financial) मदत दिली जाते. तसेच, त्यांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतात.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
ही योजना आयुष्मान भारत योजना (Ayushyaman Bharat Yojana) म्हणूनही ओळखली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची काळजी घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत कर्करोगासह अनेक प्राणघातक आणि गंभीर आजारांच्या उपचारांचा खर्च सरकार उचलते.

आरोग्य मंत्र्यांचे विवेकाधीन अनुदान
भारत सरकारने कर्करोग रुग्णांसाठी सुरू केलेली ही पहिली योजना आहे. या योजनेंतर्गत कर्करोगग्रस्तांना आर्थिक (Finance) मदत केली जाते. रूग्णांना 1 लाख 25 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. जेणेकरुन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचा आणि उपचाराचा खर्च उचलता येईल.

राज्य आजार सहाय्य निधी
कर्करोगाच्या रुग्णांसाठी भारत सरकारच्या विशेष योजनांपैकी ही एक योजना आहे. देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आजारी सहाय्यता निधी अंतर्गत, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत घेऊ शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The government is providing financial assistance for cancer patients under this scheme, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button